घरमुंबईदहा वर्षे मुंबईला खड्ड्यात कोणी घातले? मुख्यमंत्री शिंदेंचा सवाल

दहा वर्षे मुंबईला खड्ड्यात कोणी घातले? मुख्यमंत्री शिंदेंचा सवाल

Subscribe

 

मुंबई: रस्ते, रस्त्यावरील खड्डे, नाल्यांची समस्या, नदी पुनरुज्जीवन आदी महत्वाची कामे यापूर्वी व्हायला पाहिजे होती. गेली दहा वर्षे मुंबईला कोणी खड्ड्यात घातले ? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना उपस्थित केला.
तसेच, आता मुंबईच्या दुरावस्थेला जबाबदार कोण हे लोकांना चांगले माहीत आहे. तेच त्यांना जाब विचारतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
रस्ते कामांबाबत भ्रष्टाचार झाल्याचा जे आरोप आता करीत आहेत, या चोरांच्या उलट्या बोंबा आहेत, असे खणखणीत उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी, माजी मंत्री व आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता दिले.
आता आमची सत्ता आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या विकासकामांना आम्ही चालना देत आहोत. अनेक वर्षांपासून साचलेला गाळ साफ करीत आहोत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

- Advertisement -

मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या नालेसफाई संदर्भात मुंबईकरांना अभिप्राय, तक्रार नोंदविण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसीत करावी. कचऱ्याच्या समस्येबाबतही तक्रारीसाठी संपर्क क्रमांक तयार करावा. नाल्यांना फ्लडगेट बसविण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापालिका प्रशासनाला दिले. सलग दुसऱ्यादिवशी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईतील पश्चिम उपनगरांतील नालेसफाईची पाहणी केली. चार तासांहून अधिक हा पाहणी दौरा सुरू होता. एके ठिकाणी मुख्यमंत्री स्वत: नाल्याच्या पात्रात उतरले आणि त्यांनी कामाची पाहणी करत सफाई कर्मचाऱ्याशी संवाद देखील साधला.

दरम्यान, अंधेरीतील गोखले पुलाचे कम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.  यानंतर बोरीवली येथील अटल स्मृती उद्यान येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांवर अभिप्राय नोंदवता यावा त्याचबरोबर नालेसफाईबाबत तक्रार असेल तर नागरिकांनी १ ते १० जून दरम्यान त्याची छायाचित्रे महापालिकेला पाठवावी. नालेसफाईमध्ये कुचराई करणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगतानाच संबंधित कामी हलगर्जी केल्याबद्दल अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगीतले.
रस्त्यांवरील कचऱ्याची तक्रार करता यावी, यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला केल्या आहेत. जोरदार पावसात पाणी साचून मुंबईतील नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी नाल्यातून गाळ काढण्याची कामे काटेकोरपणे पूर्ण करावीत. आवश्यक ठिकाणी पाणी साठवण भूमिगत टाक्या, फ्लड गेट्सची यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचना देखील त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -