घरमुंबईमुलाच्या शाळेत डान्स केला म्हणून नवऱ्याने बायकोला बॅटने झोडले

मुलाच्या शाळेत डान्स केला म्हणून नवऱ्याने बायकोला बॅटने झोडले

Subscribe

मुलांच्या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात पत्नीने नृत्यात सहभाग घेतला. मात्र हा प्रकार पतीला समजताच त्याने तुझी आई डान्सबारमध्ये डान्स करायला गेली, तरी काही बोलणार नाही, असे वक्तव्य मुलाकडे केले. तुम्ही डान्सबारचा शब्द घरात बोललात कसा? असा सवाल पत्नीने पतीला केला. डान्सबारच्या शब्दावरून दोघांमध्ये वादावादी झाल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅटने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. याप्रकरणी पत्नीला जबर दुखापत झाली असून पती विरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा परिसरात सुनील काळोखे हे पत्नी व मुलासह राहतात. दोन दिवसांपूर्वी पत्नी अल्पा हिने आपल्या मुलाच्या शाळेत सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातील नृत्यामध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे संतापलेला त्यांचा पती सुनील काळोखे याने त्याच्या मुलाला तुझी आई डान्स बारमध्ये डान्स करायला गेली तरी काही बोलणार नाही, असे म्हणाले होते. बाबांचे बोलणे मुलाने आईला सांगितले. त्यामुळे पत्नी अल्पा यांनी पतीला तुम्ही हा डान्सबार शब्द घरात बोललात का? याचा जाब विचारला. यावरून दोघांमध्ये वादवाद होऊन कडाक्याचे भांडण झाले. या वादातून पती सुनीलने क्रिकेटच्या बॅटने पत्नी अल्पा यांना बेदम मारहाण केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -