घरमुंबईमहाराष्ट्रात थंडीच्या कडाक्याचा प्रभाव कमी राहणार

महाराष्ट्रात थंडीच्या कडाक्याचा प्रभाव कमी राहणार

Subscribe

यंदा संपुर्ण देशभरात राजस्थान, नवी दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख यासोबतच इतर राज्यात मुख्यत्वेकरून उत्तर आणि उत्तर पश्चिम भारतात यंदा थंडीचा कडाका सर्वाधिक असणार आहे. भारतीय प्रादेशिक हवामान केंद्राकडून डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीतल्या हवामानाचा अंदाज वर्तवणारी माहिती जाहीर करण्यात आली आहे. थंडीच्या मौसमात तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असेल अशी माहिती हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये उत्तर, उत्तर पश्चिम, मध्य भारतात तापमान हे सरासरीपेक्षा कमी असेल. दिल्लीत गेल्या दशकातली सर्वात कडाक्याची थंडी गेल्या वर्षी नोंद झाली आहे. गेल्यावर्षी दिल्लीत ७ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सरासरीपेक्षा ही तापमानाची नोंद ही ३ डिग्री सेल्सिअसने कमी होती.

आगामी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी राजस्थान, पूर्व राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, लडाख, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आदी भागातही तापमान हे सरासरीपेक्षा कमी असेल. तर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि दक्षिण पेनिनसुला भागात तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असेल. त्यामुळे यंदा थंडीचा प्रभाव कमी असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

- Advertisement -

यंदा ला निनाचा प्रभाव हा थंडीवर असणार आहे. ला निनाच्या वातावरणामुळे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे काही अपवाद वगळता तापमान हे सरासरीपेक्षा जास्त असणार आहे. पण बहुतांश भागात मात्र थंडीचा प्रभाव तितकासा जाणवणार नाही असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. देशाच्या उत्तरेकडील भागात मात्र थंडीचा मुक्काम यंदा अधिक कालावधीसाठी असणार आहे.


 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -