घरमुंबईमध्य रेल्वेच्या ४३ हिवाळी स्पेशल ट्रेन

मध्य रेल्वेच्या ४३ हिवाळी स्पेशल ट्रेन

Subscribe

एलटीटी,पनवेल ते करमाली दरम्यान धावणार ट्रेन

ख्रिसमसचा आनंद आणि नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकण आणि गोव्याला जाणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य मध्य रेल्वे प्रशासनाने ४३ स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. एलटीटी,पनवेल ते करमाली दरम्यान या स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे.त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना आणि पर्यटकांना दिलासा मिळणार आहे.

एलटीटी-करमाली स्पेशल ट्रेनच्या १४ फेर्‍या चालविण्यात येणार आहेत. ०१०४५ ट्रेन दर शुक्रवारी रात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटणार असुन त्याच दिवशी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी करमालीला पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ०१०४६ ट्रेन दर शुक्रवारी दुपारी १ वाजता सुटून त्याच रात्री १२ वाजून २० मिनिटांनी एलटीटीला पोहचणार आहे. ही ट्रेन २२ नोव्हेंबर ते ३ जानेवारी दरम्यान चालविण्यात येणार आहे.०१०५१ एलटीटी-करमाली ट्रेन दर शुक्रवारी (२२ नोव्हेबर ते ३ जानेवारी) रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार असुन दुसर्‍या दिवशी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी करमालीला पोहचणार आहे.तर परतीच्या प्रवासासाठी ०१०५२ ट्रेन दर रविवारी (२४ नोव्हेबंर ते ५ जानेवारी) दुपारी १ वाजता सुटणार असुन रात्री १२ वाजून २० मिनिटांनी एलटीलीला पोहचणार आहे.

- Advertisement -

ठाणे,पनवेल,रोहा,माणगाव,खेड,चिपळुण,संगमेश्वर,रत्नागिरी,वैभववाडी,कणकवली,सिंधुदुर्ग, कुडाळ ,सावतंवाडी आणि थिविम या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.या गाडीला एसी टु टायरचा एक,एसी थ्री टायरचे ४,स्लीपर क्लासचे १२ आणि जनरल सेकण्ड क्लासचे ३ कोच असणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -