घरमुंबईसॉफ्ट पॉवरद्वारे भारत जगावर प्रभुत्व मिळवू शकतो.

सॉफ्ट पॉवरद्वारे भारत जगावर प्रभुत्व मिळवू शकतो.

Subscribe

भारताची कला, संगीत, योग, खाद्यपदार्थ, शिल्पकला, वस्त्रकला, नृत्यकला व संस्कृत व हिंदी या भाषांचे जगाला आकर्षण आहे. भारताचे हे सामर्थ्य असून, आपली सॉफ्ट पॉवर आहे. या सॉफ्ट पॉवरद्वारे भारत जगावर प्रभुत्व मिळवू शकतो असे विचार आयसीएसएसआरचे अध्यक्ष व राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेतर्फे घेतलेल्या ‘नो युवर लेगसी’ व्याख्यानमाले अंतर्गत ‘इंडियाज सॉफ्ट पॉवर पोटेन्शियल’ या विषयावर बोलत होते. या कार्यक्रमास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर व प्र-कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी हे उपस्थित होते. डॉ.विनय सहस्रबुद्धे पुढे म्हणाले, आयसीएसएसआरचा अध्यक्ष म्हणून विविध देशात गेलो असता जगामध्ये भारताप्रती अपार स्नेह असल्याचे दिसून आले. अफगाणिस्तानचा भारतावर दृढ विश्वास आहे, जर्मनीला भारताच्या भाषेविषयी कुतुहल आहे. पाकिस्तानात भारताच्या नृत्याविषयी आवड आहे.

- Advertisement -

बीजिंगमध्ये लोकांना भरतनाट्यम आवडते. जगातील अनेक देशाला बॉलीवूडचे आकर्षण आहे. योगचा वापर करणारे जगात सर्वत्र आढळतात. भारतीय भाषेविषयी पाहिले तर जगातील अनेक देशात संस्कृत व हिंदीचे अध्ययन केले जाते. भारतीय पदार्थ, कलाकुसर, शिल्पकला,मेहंदी, रांगोळी जगात प्रसिद्ध आहेत. याच भारताच्या खर्‍या सॉफ्ट पॉवर आहेत. याचा व्यवस्थित प्रचार व प्रसार केल्यास जगावर भारताचे प्रभुत्व निर्माण होईल व भारत जगाचा विश्वगुरू बनेल, तशी भारतात क्षमता आहे, असेही डॉ.विनय सहस्रबुद्धे म्हणाले.

‘कॉफी टेबल बुक’ चे प्रकाशन
मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य दीपक मुकादम यांच्या वार्षिक अहवालाच्या ‘कॉफी टेबल बुक’ चे प्रकाशन आयसीएसएसआरचे अध्यक्ष व राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्रबुद्धे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर व प्र-कुलगुरू डॉ.रविंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते केले. यात मुकादम यांनी वर्षभरातील मुंबई विद्यापीठाच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -