घरमुंबईओळखपत्राशिवाय कर्मचार्‍यांना मुख्यालयात प्रवेशबंदी

ओळखपत्राशिवाय कर्मचार्‍यांना मुख्यालयात प्रवेशबंदी

Subscribe

महापालिकेची सुरक्षा व्यवस्था केली कडक

जम्मू व काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आल्याने महापालिकेची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आली. त्यामुळे यापुढे महापालिका मुख्यालयात आता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक कर्मचार्‍यांचे ओळखपत्र तपासणे तसेच साहित्य व बॅगेज यांची तपासणी करण्याची प्रक्रीया कडक करण्यात येत आहे. यानुसार १ सप्टेंबरपासून ज्या कर्मचार्‍यांकडे ओळखपत्र नसेल त्यांना मुख्यालयात प्रवेश नाकारला जाणार आहे. कर्मचार्‍यांना त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे सक्तीचे ठरणार आहे.

मुख्यालयात कर्तव्यावर असणार्‍या प्रत्येक महापालिका कर्मचार्‍याने मुख्यालय इमारतीत प्रवेश घेतल्यापासून कार्यालय सुटेपर्यंत ओळखपत्र गळ्यात घालून राहणे किंवा दर्शनी भागावर अडकवणे आवश्यक असल्याचे परिपत्रक २३ ऑगस्ट रोजी सुरक्षा विभागाने जारी केले आहे. यामध्ये नियमित काम करणार्‍या कंत्राटी कामगारांकरता संबंधित विभागाने सुरक्षा विभागाकडून ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे. ओळखपत्र हरवले असेल किंवा जुने झाले असेल तर १ सप्टेंबरपूर्वी बनवून घ्यावे. तर मुख्यालयात येणारे अभ्यांगत, कर्मचार्‍यांचे नातेवाईक इत्यादी लोकांना केवळ गेट क्र. २ व ७ मधून प्रवेश दिला जाईल.

- Advertisement -

तर विभागावरच कारवाई
मुख्यालय इमारतीत बर्‍याचदा कर्मचार्‍यांकडून अगरबत्ती, चष्मेवाला, अत्तरवाला, एलआयसी एजंट इत्यादी विक्रेते तसेच ऑनलाईन डिलिव्हरी बॉय इत्यादींना आमंत्रित केले जाते. त्यामुळे अशा एजंटांना बोलावू नये. जर अशाप्रकारे ज्या कुणी बोलावले असेल, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -