घरमुंबईफक्त धक्का लागला म्हणून महिला प्रवाशाने घेतला चावा

फक्त धक्का लागला म्हणून महिला प्रवाशाने घेतला चावा

Subscribe

रेल्वे पोलीसआरोपी महिला विरोधात गुन्हा दाखल

महिला डब्यात प्रवास करणार्‍या एका महिलेला धक्का लागल्यामुळे थेट चावा घेत नखाने ओरबडल्याचा धक्कादायक प्रकार पश्चिम रेल्वेतील लोकलमध्ये घडला. कामावरुन घरी परतत असताना लोअर परळ ते दादर दरम्यान हा प्रकार घडल्यामुळे पिडित तरुणीने तातडीने रेल्वे पोलिसांकडे धाव घेत सहमहिला प्रवाशांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहे.

सांताक्रूझ येथे राहणार्‍या महिला प्रवासी नजराना पिल्ले यांनी लोअर परळ स्थानकातून सायंकाळी ९.१६ वाजताची बोरीवली स्लो लोकल पकडली. लोकलमधील जनरल डब्यांमध्ये गर्दी असल्याने प्रभादेवी ते दादर दरम्यान शेजारी असलेल्या महिला प्रवाशांला धक्का लागला. यावेळी आरोपी महिलेने माझ्या बरगडीवर जोरदार धक्का दिला. मी विरोध करताच त्या महिलेने हात पकडून मुरगळत नखे मारण्यास सुरुवात केली, असे नजराना यांनी सांगितले. या गोंधळात दादर स्थानक गेल्याने ‘माटुंगा रेल्वे पोलिसांकडे चल’, असे म्हणताच त्या महिला प्रवाशाने डाव्या दंडाचा जोरदार चावा घेत, बरगडीवर धक्का दिल आणि त्यानंतर ती माहिम स्थानकात उतरली.

- Advertisement -

Women Assaulted in train

या झटापटीत सुमारे ९ हजार रुपये किमतीची ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी हरवली. यामुळे नजरानाने रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रभादेवी ते दादर या दरम्यान महिला प्रवाशांची झटापटी झाल्याने ही तक्रार मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. या अज्ञात महिले विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी दिली. पिल्ले यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी महिलेवर कलम ३२३, ५०४, ४२७ आणि ३२४ कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

Women Assaulted in train

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -