घरमुंबई...म्हणून कांदा सर्वसामान्यांना रडवतोय!

…म्हणून कांदा सर्वसामान्यांना रडवतोय!

Subscribe

सध्या कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. दरम्यान कांद्याचे भाव वाढल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कांद्याची आवक घटल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्याचा परिणाम किरकोळ बाजारातील कांद्याच्या खरेदी-विक्रीवरसुद्धा होत आहे. किरकोळ बाजारात ग्राहकांना प्रतिकिलो कांद्याला ६० रुपयांहून अधिक रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सध्या कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. दरम्यान कांद्याचे भाव वाढल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दिवाळीनंतर भाव स्थिरावतील

नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात दररोज कांद्याच्या १०० ते १२५ गाड्यांची आवक होत होती. पण गेल्या काही दिवसांपासून ही आवक घटली आहे. आता एपीएमसीमध्ये कांद्याची ७५ गाड्यांची आवक होत आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढत आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात कांद्यासाठी प्रतिकिलोला ४० रुपये तर किरकोळ बाजारात प्रतिकिलोला ६० रुपयांहून अधिक रुपये मोजावे लागत आहेत. दिवाळीनंतर मात्र कांद्याचे भाव स्थिरावतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी बोलावली आमदार, खासदार नगरसेवकांची बैठक; महत्त्वाच्या सूचना देणार

शेतकऱ्यांमध्ये आनंद

दरम्यान कांद्याचे भाव वाढल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरीसुद्धा आपल्याकडील कांदा कमी प्रमाणात विक्रीला काढत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -