घरताज्या घडामोडीरस्त्यावर रोमान्स करताना थांबवणं पडलं महागात, महिलेला खावा लागला मार!

रस्त्यावर रोमान्स करताना थांबवणं पडलं महागात, महिलेला खावा लागला मार!

Subscribe

मुंबईच्या शिवडी परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सार्वजनिक ठिकाणी एक जोडप्याला रोमान्स करताना थांबवणं एका महिलेला चांगलच महागात पडलं आहे. त्या जोडप्याने महिलेला बेदम मारहाण केली आहे. मुमताज कादीर शेख असं या महिलेचं नाव आहे. भररस्त्यात एख जोडपं रोमान्स करत होतं. त्यावेळी त्या महिलेनं अडवलं म्हणून तीला या जोडप्याने बेदम मारहाण केली.

मुमताज शेख या दररोज परप्रांतीय मजुरांना जेवण पोहचवतात. त्यांच्याबरोबर काही महिला त्यांना या कामात मदत करतात. २ मेला मुमताज जेवण देऊन घरी परतत असताना त्यांना रस्त्यात एक जोडपे अश्लील चाळे करताना दिसले. या जोडप्यातील मुलगी मुमताज यांच्या घराजवळ राहणारी होती. पण मुमताज यांनी अचानक असे रोखल्यामुळे मुलीच्या बॉयफ्रेंडने मुमताज यांचा गळा आवळला.

- Advertisement -

या प्रकारानंतर मुलीने तीच्या पालकांना बोलवले. मुलीचा भाऊ, आई आणि काकू तीथे आल्या. आणि त्यांनी देखील मुमताज यांना मारहाण केली. शिवडी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.


हे ही वाचा – पुढील ९ महिन्यात भारतात २ कोटी तर जगात ११ कोटी बालकांचा जन्म – युनिसेफ

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -