घरमुंबईबचत गटातील महिला देणार आर्थिक साक्षरतेचे धडे

बचत गटातील महिला देणार आर्थिक साक्षरतेचे धडे

Subscribe

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील उमेदच्या बचतगट महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. गोवोगावातील महिला बचत गटांतील महिला आणि गावकऱ्यांना या महिला आर्थिक साक्षरतेचे धडे देणार आहेत.

ग्रामीण भागातील कुटुंबांमध्ये आर्थिक निरक्षरता दूर व्हावी, बँकेचे आर्थिक व्यवहार, आर्थिक बचती विषयीची माहिती व्हावी, या उद्देशाने महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून उमेदच्या अभियाना अंतर्गत येणाऱ्या महिला बचत गटांच्या निवडक महिलांना आर्थिक साक्षरता प्रशिक्षण देण्यात आले. आता या समूह संघटक महिला गावोगावी जाऊन आर्थिक साक्षरतेचे धडे देणार आहेत. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या ७२ समूह संघटक महिलांना मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी) ब. भि. नेमाने यांच्या हस्ते आज आर्थिक साक्षरता प्रशिक्षण संच वाटप करण्यात आला.

महिला करणार आर्थिक साक्षरतेचा प्रचार 

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील बचत गटांतील महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. आता या बचत गटातील महिला व इतर महिला गावोगाव जाऊन आर्थिक साक्षरतेचा प्रचार करणार आहेत. यामध्ये आर्थिक नियोजन, समंजस खर्च, स्मार्ट सुरेख, सुज्ञ कर्ज/उसणवारी, विमा संरक्षण आणि निवृत्ती वेतन, नवीन बँक सवयी, बँक व्यवहाराच्या चांगल्या सवयी, भारत सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजना आदीची माहिती प्रशिक्षणार्थी महिला देणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – महापालिकेला झटका; कोस्टल रोडला उच्च न्यायालयाचा नकार!

मनोरंजनातून साक्षरतेचे धडे

गावातील लोकांना आर्थिक साक्षरतेची सहज-सुलभ माहिती व्हावी यासाठी विविध खेळ घेण्यात येणार आहेत. या खेळातून आर्थिक साक्षरतेचा प्रचार केला जाणार आहे. यासाठी सापशिडी खेळाचा वापर करण्यात येणार आहे. यावेळी गावकऱ्यांना, महिला बचत गटांना मनोरंजनातून साक्षरतेचे धडे गिरवता येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -