घरमहाराष्ट्रनाशिकझेडपी सीईओ डॉ. गितेंच्या जागेवर एस. भुवनेश्वरी

झेडपी सीईओ डॉ. गितेंच्या जागेवर एस. भुवनेश्वरी

Subscribe

डॉ. गीते यांना भंडारा येथे जिल्हाधिकारी म्हणून बढती

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांना अवघ्या दीड वर्षात पदोन्नती मिळाली असून, त्यांची भंडारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. डॉ. गिते यांच्या जागी यवतमाळ सहायक जिल्हाधिकारी भूवनेश्वरी एस. यांची नियुक्ती झाली आहे. भूवनेश्वरी या सन 2015 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.

राज्यातील 26 सनदी अधिकार्‍यांच्या एकाच दिवसात बदल्या झाल्या आहेत. यात प्रामुख्याने अतिरीक्त आदिवासी आयुक्त एम. जे. प्रदीपचंद्रन यांची नाशिकच्या अतिरीक्त विभागीय आयुक्तपदी बदली झाली आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. नरेश गिते यांची 6 फेब्रुवारी 2018 रोजी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली होती. डॉ. गिते यांनी सुत्रे हाती घेतल्यापासून, स्वतंत्र न्यायालयीन कक्ष स्थापन केला. तसेच सर्व विभागातील ई-निविदा एकाच ठिकाणाहून काढण्यासाठी निविदा कक्ष कार्यन्वीत केला. नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांना शासनाकडे पाठपुरावा करत पहिल्या टप्यात 25 कोटींचा निधी पदरात पाडून घेतला. सहा महिन्यांपासून डॉ. गिते यांची पदोन्नती होणार असल्याची चर्चा होती. परंतू, शासनाने निवडणुकांच्या तोंडावर रखडलेल्या 26 आयएसएस अधिकार्‍यांना पदोन्नती दिली. यात डॉ. गिते यांची भंडारा जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. डॉ. गिते यांच्या जागी यवतमाळ सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी भूवनेश्वरी एस. यांची नियुक्ती झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -