घरताज्या घडामोडी'त्या' वृत्तामुळे वडाळा बेस्ट आगारातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती घटली!

‘त्या’ वृत्तामुळे वडाळा बेस्ट आगारातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती घटली!

Subscribe

एका वृत्तामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बस सेवेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बेस्ट बसेस रस्त्यावर येऊ शकल्या नाही.

वडाळा आगारातील बेस्ट कामगाराला कोरोनाची लागण झाल्याची बातमी प्रसार माध्यमातून वाऱ्यासारखी पसरली आणि त्याच्या परिणाम शनिवारी अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या बस सेवेवर झाला. या आगारातील बहुतांशी सर्वच कर्मचारी भीती पोटी उपस्थित न राहिल्यामुळे रुग्णालयांसह सर्व अत्यावश्यक सेवेतील कामगार, कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या बेस्ट बसेस रस्त्यावर येऊ शकल्या नाही. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली.

तो व्यक्ती पूर्ण बरा

मुंबईच्या वडाळा बस डेपोतील पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त शुक्रवारी काही वृत्तवाहिन्यांवर दाखवत वडाळा आगार लॉकडाऊन असल्याचे सांगितले. कोरोनाग्रस्त कर्मचारी हा सुट्टीवर होता. त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत कोठे गेला होता. त्याच्या संपर्कात कोण आले याची माहिती घेऊन या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाईन राहायला सांगण्यात आल्याचे या वृत्तांत म्हटले. या बातमीमुळे बेस्ट कर्मचारी हादरुन गेले असून या भीतीमुळे शनिवारी ते कामावरच रुजू झाले नाही. वडाळा आगारातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, केवळ एका बातमीमुळे कर्मचारी घाबरुन कामावर आलेले नाहीत. ज्या कर्मचाऱ्याला कोरोना झाला होता, असे म्हटले जात आहे. तो कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून सुट्टीवरच होता. आणि पूर्ण बरा झाला आहे. मात्र, या बातमीमुळे घाबरुन वडाळा आगारातील कर्मचारी कामावर आले नसल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

एकही गाडी बाहेर काढता आलेली नाही

वडाळा डेपो लॉकडाऊन झाल्याच्या या वृत्तामुळे केवळ वडाळाच नाही तर याचा परिणाम इतरही आगारांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे जर कर्मचारी नसेल तर अत्यावश्यक सेवेतील कामगारांना वाहतूक व्यवस्था कशी पुरवायची असा सवाल त्यांनी केला. वडाळा आगारांमध्ये चालक आणि वाहक नसल्यामुळे एकही गाडी बाहेर काढता आलेली नाही.

चालक अथवा वाहकाला करोना विषाणुची लागण झालेली नसून…

बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी याबाबत बोलतांना, संबंधित कर्मचारी हा विद्युत पुरवठा विभागाचा आहे. पण तो कर्मचारी पूर्वी आजारीच होता आणि त्यानंतर तो सुट्टी मंजूर करून घेण्यासाठी एकच दिवस आला होता. त्यानंतर रुग्णालयात दाखल झाला. तेव्हा त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पण कर्मचारी घरीच होता आणि तो बराही झाला आहे. परंतु पूर्ण माहिती न घेता वृत्त दिल्यामुळे या आगारातील उपस्थिती घटली आहे, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांशी चर्चा करून अन्य आगारांमधून बस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु अद्यापही कोणाही चालक अथवा वाहकाला करोना विषाणुची लागण झालेली नसून त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्याचे पाटणकर यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईकरांसाठी गुडन्यूज! आज मध्यरात्रीपासून सीएनजी, पीएनजीचे दर कपात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -