घरमुंबईधक्कादायक: चॉकलेटमध्ये आढळले किडे

धक्कादायक: चॉकलेटमध्ये आढळले किडे

Subscribe

उल्हासनगरच्या भाटीया चौकात ही घटना घडली आहे. याप्रकरणी सदर व्यक्तीने अन्न व औषधे प्रशासनाकडे तक्रार केली आहे .

उल्हासनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. चॉकलेटमध्ये किडे आढळले आहे. एका व्यक्तीने त्याच्या लहान मुलासाठी दुकानातून चॉकलेट खरेदी केले. हे चॉकलेट खोलले असता त्यामधून किडे बाहेर आले. उल्हासनगरच्या भाटीया चौकात ही घटना घडली आहे. याप्रकरणी सदर व्यक्तीने अन्न व औषधे प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

दुकानदाराने हात वर केले

उल्हासनगर – ४ येथे संजय अहिरे हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. गुरुवारी दुपारी घराजवळील भाटिया चौकमधील एका दुकानातून त्यांनी मुलांसाठी चॉकलेट खरेदी केले. मुलांनी दोन चॉकलेट खाल्ल्यानंतर तिसऱ्या चॉकलेटचे रॅपर उघडत असताना त्यांच्यामधून काळ्या रंगाचे बारीक किडे बाहेर आले. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर अहिरे यांनी ताबडतोब दुकानदाराला ते चॉकलेट आणि किडे दाखविले आणि जाब विचारला. यावर दुकानदाराने ‘माझी चुकी नसून चॉकलेट कंपनीची चूकी आहे असे सांगून हात वर केले’.

- Advertisement -

अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल

संतप्त झालेल्या अहिरे यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार करा असे त्यांना सांगितले आणि तक्रारीची केवळ नोंद करून घेतली. पोलिसांच्या सल्ल्यानुसार अहिरे यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे. चॉकलेटमध्ये किडे असल्याचे पाहिल्यानंतर संजय अहिरे यांचा मुलगा घाबरला असून तो आजारी पडल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -