घरमुंबईबंद कंपनीत आढळला तरूणाचा मृतदेह

बंद कंपनीत आढळला तरूणाचा मृतदेह

Subscribe

उल्हासनगर येथील एका बंद कंपनीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या बंद आयडीआय कंपनीच्या कॅन्टींन मधील पहिल्या माळयावरील रूममध्ये एका तरूणाचा अत्यंत सडलेल्या अवस्थेत गळफास घेतलेला मृतदेह उल्हासनगर पोलिसांना आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहाड परिसरात आयडीआय कंपनी असून ही कंपनी बऱ्याच वर्षांपासून बंद स्थितीत आहे. त्या कंपनीतून मोठया प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने त्या ठिकाणी कोणतातरी अनुचित प्रकार घडला आहे, अशी माहिती एका अज्ञात इसमाने ठाणे कंट्रोलला दिल्यावर त्यांनी त्वरीत उल्हासनगर पोलिसांना या घटनेबाबत कळविले आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नेमके काय घडले?

उल्हासनगर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी त्वरीत त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता बंद असलेल्या त्या कंपनीच्या कॅन्टींनवरील पहिल्या माळयावर एका खोलीत हुकाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत अत्यंत सडलेला मृतदेह लटकत्या अवस्थेत पोलिसांना दिसून आला. त्या मयत तरूणाच्या खिशात पोलिसांना इंग्रजीमध्ये लिहीलेली सुसाईड नोट सापडली आहे. त्या मयत तरूणाबाबत पोलिसांनी तपास करून चौकशी केली असता त्याचे नाव प्रभात रामगिरी गोसावी (२२) असून तो धाकटे शहाड, मोहने रोड येथील बंदरपाडा परिसरात राहणारा असल्याचे समजले. पोलिसांनी मयत प्रभात याच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता प्रभात हा ४ स्टपासून बेपत्ता झाला होता. त्याच्या घरच्यांनी २ दिवस त्याचा शोध घेतल्यावर ६ गस्ट रोजी खडकपाडा पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसही त्याचा शोध घेत होते. तब्बल ९ दिवसानंतर प्रभात याचा बंद असलेल्या कंपनीत गळफास घेतलेला सडलेला मृतदेह मिळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईतील आर्ट डायरेक्टरचा मृतदेह विरारच्या खाडीत


दरम्यान, त्याच्या मृत्यूबाबत अनेक तर्क वितर्क काढले जात आहेत. पोलिसांना घटनास्थळी मिळालेली सुसाईड नोट ही प्रभात यानेच लिहीलेली आहे का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रभात याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. वैद्यकिय अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली असून अधिक तपास पो.उप.नि.सानप करीत आहेत. तर दुसरीकडे प्रभात याची आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आली असावी, असाही संशय व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नगरमध्ये आढळला रेल्वे ट्रॅकवर पत्रकारचा मृतदेह


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -