घरमुंबईकोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याची तयारी

कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याची तयारी

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव सोमवारी 169 मतांनी विधानसभेत जिंकला असून, हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटलांची याची घोषणा केली. परंतु, विरोधी पक्षाने शपथविधीदरम्यान काही गोष्टींवर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. त्यालाच आज एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. शिवतीर्थावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आदरणीय बाळासाहेबांच्या स्मारकासमोर, लाखो महाराष्ट्रातील जनतेच्या समोर या सरकारचा शपथविधी झालेला आहे. तसेच बाळासाहेबांमुळे आम्ही या सभागृहात आलो. जी काही कार्यवाही करायची असेल, त्याला सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचेही एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.

काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले सगळेच आणि मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून शपथ घेतली आहे. बाळासाहेबांना वंदन केल्याशिवाय कुठलीही शपथ किंबहुना कुठले कामकाज आम्ही करत नाही. आम्हाला 169 मतांचे बहुमत मिळाले आहे. त्यामुळे विरोधकांनी बहुमतासमोर थांबायला हवे होते. उद्धव ठाकरेंचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -