घरमुंबईतर क्रिस्टलमधील मृत्यू रोखता आले असते

तर क्रिस्टलमधील मृत्यू रोखता आले असते

Subscribe

क्रिस्टल इमारतीला ओसी नव्हती. या इमारतीमध्ये वेळीच राहण्यास बंदी घातली असती तर चार जणांचा मृत्यू झाला नसता.

क्रिस्टल इमारतीला ओसी नव्हती. या इमारतीमध्ये वेळीच राहण्यास बंदी घातली असती तर चार जणांचा मृत्यू झाला नसता. ओसी नसलेल्या अशा इमारतींवर कारवाई करून इमारतीमध्ये कोणालाही राहण्यास दिले नाही तर असे मृत्यू रोखता आले असते असे क्रिस्टल आगीमधून १५ जणांचा जीव वाचवणार्‍या झेन सदावर्ते हीने म्हटले आहे. झेन सदावर्ते हिचा सत्कार पालिका आयुत अजोय मेहता यांच्याहस्ते करण्यात आला यावेळी झेन बोलत होती. सत्कार प्रसंगी डॉन बॉस्को इंटरनॅशल शाळेच्या प्राचार्या मीना साल्ढान्हा झेनचे वडील ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते व आई डॉ. पाटील उपस्थित होते.

त्याआधी झेनने आपल्याला बोलायला देणार असाल तरच मी सत्कार स्वीकारेन असे आयुक्तांना सांगितले. आयुक्तांनी झेनला बोलायला दिल्यावर मुंबईमधील इमारतींची वायरिंग कन्सिल्ड करण्याची, ज्या इमारतींना ओसी नाही त्यामध्ये कोणाला राहायला न देता ती इमारत खाली करावी. जेणे करून दुर्घटना घडून कोणाचा मृत्यू होणार नाही असे झेनने म्हटले आहे. डॉन बॉस्को इंटरनॅशल शाळेत ज्या शिक्षकांनी आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले होते, त्या शिक्षकांना महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील पर्यवेक्षक राजेंद्र लोखंडे यांनी प्रशिक्षण दिले होते. तसेच जल अभियंता खात्याच्या भांडूप संकूल येथील कार्यालयात मदतनीस म्हणून कार्यरत असणारे प्रविण ब्रम्हदंडे आणि पूर्वी अग्निशमन दलात कार्यरत असणारे व सध्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्यात नियंत्रण कक्ष चालक असणारे भरतकुमार फुणगे यांचाही सत्कार करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -