घरनवी मुंबईनवी मुंबई महापालिकेच्या कर्मचार्‍यांचे कलारंग

नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचार्‍यांचे कलारंग

Subscribe

नवी मुंबई-: नवी मुंबई महापालिकेच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त १ जानेवारी २०२४ रोजी महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत बहारदार गीत, नृत्य, नाटय आणि सादरीकरण करुन कलारंग उधळले. (32nd Anniversary of Navi Mumbai Municipal Corporation) विविध कलाविष्काराच्या कार्यक्रमात रसिकांची उत्स्फुर्त दाद मिळाली.

पालिका अधिकारी, कर्मचार्‍याचा अंगभूत कला, क्रीडा गुणांना उत्तेजन मिळण्यासाठी वर्धापनदिनाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केल्या जाणार्‍या विविध स्पर्धात्मक उपक्रमांना जो भरभरुन प्रतिसाद मिळतो आणि या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी यांच्यामधील कौशल्याचे दर्शन घडते ही बाब आनंद देणारी असल्याचे मत व्यक्त करीत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी सहभागी कलावंत कर्मचार्‍यांचे कौतुक केले.
यावेळी मनोगत व्यक्त् करतांना अतिरिक्त् आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी व्यावसायिक कलावंतांच्या तोडीस तोड असे गीत, नृत्यांचे अप्रतिम सादरीकरण करणार्‍या कर्मचारी कलावंतांची प्रशंसा करीत ज्या खेळीमेळीच्या वातावरणात दर्जेदार स्वरुपात हा कार्यक्रम आयोजित केला जातो ही संस्कृती नवी मुंबईचा नावलौकिक वाढविणारी असल्याचे सांगितले.

- Advertisement -

संपूर्ण दिवसभर उत्साहात संपन्न झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांतील ३४ एकल गायन व ४ समुह गायन स्पर्धकांच्या सादरीकरणाचे परीक्षण गायक महेंद्र शिवशरण यांनी केले तसेच ११ वैयक्तिक नृत्य व ९ समुह नृत्यांचे परीक्षण तसेच ८ नाटयाविष्कारांचे परीक्षण सुप्रसिध्द नृत्यांगना कथ्थक गुरु वैशाली जोशी यांनी केले. परीक्षकांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

 सहभागी स्पर्धकांतून उत्तम सादरीकरण करणार्‍या कलावंतांना अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त ललिता बाबर, सोमनाथ पोटरे, दिलीप नेरकर, मंगला माळवे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, कार्यकारी अभियंता प्रविण गाडे, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे व रेवप्पा गुरव, विधी अधिकारी अभय जाधव, प्रशासकीय अधिकारी रवी जाधव यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -