घरनवी मुंबई वीज चोरांना महावितरणचा शॉक;१२९ ग्राहकांवर गुन्हा दाखल

 वीज चोरांना महावितरणचा शॉक;१२९ ग्राहकांवर गुन्हा दाखल

Subscribe

नवी मुंबई-:
नवी मुंबईतील घणसोली विभागात वीजहानी जास्त असल्यामुळे वीजचोरी मोहिम भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी दिल्या होत्या. विभागा स्तरावरील अधिकार्‍यांनी संयुक्तीकपणे मोहिम राबवली होती. घणसोलीमधील उघडकीस आणलेल्या १४६ प्रकरणतील १२९ ग्राहकांनी वीजचोरीचे वीजबिल, कंपाऊडींग किंवा दोन्ही देयक भरलेले नसल्यामुळे त्यांच्यावर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case has been registered against 129 consumers of electricity theft in Ghansoli)

वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी वाशी आणि नेरूळ विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने वीजचोरीवर मोहिम राबविली होती. यात कलम १३५ अंतर्गत साधारणतः ७७ लाखांची १४६ प्रकरणे उघडकीस आली होती. तसेच कलम १२६ अंतर्गत अनधिकृत वीज वापराची २६ प्रकरणे उघडकीस आणली होती. त्या अंतर्गत साधारणतः १२.९५ लाख रूपयांची दंडात्मक रकमेची वीजबिले दिली होती. अशी एकुण तब्बल ९० लाखांची वीजचोरी व अनधिकृत वापराची एकूण १७५ प्रकरणे उघडकीस आणली होती. ग्राहकांनी वीजचोरी प्रथमतःच केली असता कायद्याने सदर गुन्हा कंपाऊडींगची सुविधा दिली आहे. चोरीचे वीजबिल व कंपाऊडींग रक्कम न भरलेल्या ग्राहकावर वीज कायदा २००३, कलम १३५ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात येते.

- Advertisement -

घणसोलीमधील उघडकीस आणलेल्या १४६ प्रकरणतील १२९ ग्राहकांनी वीजचोरीचे वीजबिल अथवा कंपाऊडींग अथवा दोन्ही भरलेले नसल्यामुळे घणसोली शाखेचे सहाय्यक अभियंता सुनिल सरोदे, यांनी वाशी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर (गुन्हा) दाखल केला आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता गोफणे, वरिष्ठ तंत्रज्ञ अश्विनी शेवाळे, सहाय्यक लेखापाल राखी चौगुले, उच्चस्तर लिपीक निलेश कराळे यांनी या मोहिमेला सहकार्य केले आहे.

अधीक्षक अभियंता वाशी मंडळचे सिंहाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता वाशी विभाग मोहोड, अति.कार्यकारी अभियंता, ऐरोली उपविभाग गोफणे, अति. कार्यकारी अभियंता वाशी विभाग कासल, सहा. अभियंता सुनिल सरोदे, नेरूळ विभागाचे बिरे आदी सहकार्य केले आहे.

- Advertisement -

वीज चोरी करणार्‍यांकडून अनेक युक्त्या वापरल्या जातात. परंतु त्या महावितरण अधिकारी शोधून काढतात. वीजचोरीची ही कीड असून ही समूळ नष्ट करणे आवश्यक आहे. वीजचोरीसारख्या आत्मसन्मानास हानिकारक बाबी पासून ग्राहकांनी दूर राहून वीज बिलांचा भरणा करुन सहकार्य करावे.
-सुनिल काकडे, भांडूप परिमंडल-मुख्य अभियंता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -