घरनवी मुंबईजाहिरातदार एजन्सी पनवेल पालिकेला वरचढ

जाहिरातदार एजन्सी पनवेल पालिकेला वरचढ

Subscribe

सिडको प्रशासनाचा ना हरकत दाखला न घेताच पालिका प्रशासनाने जाहिरात फलक उभारण्यासाठी नेमलेली एजन्सी सिडकोच्या जागेत फलक उभारत असल्यावरून सिडकोने नुकतेच नोटीस बाजावून पालिकेच्या परवाना विभागाचे कान टोचले आहेत.सिडकोने पाठवलेल्या नोटीसनंतर संबंधित विभागाची परवानगी घेऊनच जाहिरात फलक उभारण्यात यावेत, अशी ताकीद पालिका प्रशासनाकडून संबंधित जाहिरात एजन्सीला देण्यात आली होती. मात्र तरीही एमजीएम रुग्णालयाच्या शेजारी कळंबोली - जेएनपीटी मार्गावर असलेल्या सिडकोच्या भूखंडावर जाहिरातदार कंपनीकडून फलक उभारण्याचे काम सुरु करण्यात आल्याने पालिकेने नेमलेली एजन्सी पालिका प्रशासनाला जुमानतच नसल्याचे सिद्ध होत आहे.

दीपक घरत / पनवेल
सिडको प्रशासनाचा ना हरकत दाखला न घेताच पालिका प्रशासनाने जाहिरात फलक उभारण्यासाठी नेमलेली एजन्सी सिडकोच्या जागेत फलक उभारत असल्यावरून सिडकोने नुकतेच नोटीस बाजावून पालिकेच्या परवाना विभागाचे कान टोचले आहेत.सिडकोने पाठवलेल्या नोटीसनंतर संबंधित विभागाची परवानगी घेऊनच जाहिरात फलक उभारण्यात यावेत, अशी ताकीद पालिका प्रशासनाकडून संबंधित जाहिरात एजन्सीला देण्यात आली होती. मात्र तरीही एमजीएम रुग्णालयाच्या शेजारी कळंबोली – जेएनपीटी मार्गावर असलेल्या सिडकोच्या भूखंडावर जाहिरातदार कंपनीकडून फलक उभारण्याचे काम सुरु करण्यात आल्याने पालिकेने नेमलेली एजन्सी पालिका प्रशासनाला जुमानतच नसल्याचे सिद्ध होत आहे.
पनवेल पालिकेच्या जाहिरात धोरणानुसार पालिका हद्दीत विविध ठिकाणी जाहिरात फलक उभारून जाहिरातबाजी करण्यासाठी एका खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. या एजन्सी सोबत पालिकेने केलेल्या करारानुसार पालिकेच्या तिजोरीत जवळपास चार कोटी रुपयांची भर पडणार आहे. एजन्सीची नेमणूक करताना पालिकेने आखून दिलेल्या नियम आणि निकषानुसारच पालिकेने सर्व्हे करून ठरवून दिलेल्या जागेवरच जाहिरात फलक उभारण्याची परवानगी आहे. त्याच बरोबर जाहिरात फलक उभारण्यापूर्वी आखून दिलेली जागा पालिका प्रशासना व्यतिरिक्त इतर प्राधिकरणाच्या अखत्यारित येत असल्यास त्या प्राधिकरणाचा ना हरकत दाखला देखील एजन्सीने घेणे आवश्यक आहे. मात्र असे असतानाही पालिकेने नेमलेली कंपनी सिडको अथवा इतर कोणत्याही प्राधिकरणाची परवानगी न घेताच पालिका हद्दीत फलक उभारत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पालिका प्रशासन हतबल
सिडकोने पाठवलेल्या नोटीस नंतरही जाहिरात फलक उभारण्यासाठी नेमण्यात आलेली कंपनी सिडको विभागाची परवानगी न घेताच फलक उभारत असल्याने या बाबत पालिकेच्या परवाना विभागाच्या अधिकार्‍यांनकडे विचारणा केली असता सिडको विभागा कडून ना हरकत दाखला घेतला गेलेला नसल्यास सिडकोने त्या ठिकाणी कारवाई करावी असे वक्तव्य अधिकार्‍यांनी केले आहे.

- Advertisement -

पालिकेच्या धोरणाचा पालिकेला विसर
पालिका अधिनियमानुसार महामार्गाच्या किती अंतरावर जाहिरात फलक उभारण्यास परवानगी याबाबत काही नियम आखून देण्यात आले आहेत.या नियमानुसार महामार्गापासून काही मीटर अंतरावरच फलक उभारणे आवश्यक आहे. मात्र पालिकेने नेमलेली एजन्सी या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिले असता पालिकेने सर्व्हे करून दिलेल्या जागेवरच फलक उभारले जात असल्याचे आश्चर्यकारक उत्तर पालिका अधिकारी देत असून, एका प्रकारे पालिकेच्या धोरणांचेच उल्लंघन पालिका अधिकारी करत असल्याचे या वरून स्पष्ट होत आहे.

फलक उभारण्यास परवानगी कशी?
पालिकेच्या परवानगीने जाहिरात फलक उभारण्यासाठी नेमण्यात आलेली एजन्सी ज्या भूखंडावर फलक उभारत आहे. तो भूखंड सिडकोने एमजीएम रुग्णालयाला सुशोभीकरण करण्यासाठी करारावर दिला आहे. सिडको विभागाने रुग्णालय प्रशासनाशी करार केलेला असताना पालिकेचे परवाना विभाग त्या ठिकाणी फलक उभारण्यास परवानगी कशी देऊ शकते?, असा सवाल उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -