घरनवी मुंबईदि.बा.पाटील यांच्या जयंतीदिनी नवी मुंबईत महारोजगार मेळावा

दि.बा.पाटील यांच्या जयंतीदिनी नवी मुंबईत महारोजगार मेळावा

Subscribe

नवी मुंबई-: प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दि.बा.पाटील यांच्या जयंतीदिनी १३ जानेवारी रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सकाळी ९ ते ४ यावेळेत स्थानिक नागरिक, भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांसाठी महारोजगार मेळावा आणि रोजगार व स्वयंरोजगार, उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक माजी खासदार डॉ.संजीव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. ( On January 13, the birth anniversary of late D.B.Patil, the leader of the project victims)

यावेळी प्रकल्पग्रस्त संघटनेचे मनोहर पाटील, माजी महापौर जयवंत सुतार, माजी नगरसेविका माधुरी सूतार, माजी नगरसेवक प्रकाश मोर व नवीन गवते, डॉ.जयाजी नाथ, विजय वाळुंज, संकल्प नाईक आदी उपस्थित होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने निर्माण होत असलेल्या रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकता विकासाच्या संधींची माहिती देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष कृती समिती यांच्या सहयोगाने तसेच माजी खासदार डॉ.नाईक यांच्या माध्यमातून हा महारोजगार मेळावा पार पडणार आहे. मागील वर्षी हा कार्यक्रम पनवेल येथे झाला होता. यंदा हा नवी मुंबईत होणार आहे.

- Advertisement -

शंभरहून अधिक स्टॉल
रोजगाराच्या अनुषंगाने १०० ते १५० विविध कंपन्यांचे स्टॉल असणार आहेत. केंद्र सरकारचा सूक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्रालय म्हणजेच एमएसएमई, कौशल्य विकास मंत्रालय, सिडको महामंडळ, देखील यात सहभागी होणार आहेत. नवी मुंबई विमानतळाच्या अनुषंगाने निर्माण होणार्‍या संधीमध्ये स्टार्टअप सुरू करण्यासाठी तंत्रज्ञानाची माहिती या महारोजगार मेळाव्यात मिळणार आहे. या महारोजगार मेळाव्यामध्ये फॅसिलिटी मॅनेजमेंट, फिनान्स, इन्शुरन्स, सिक्युरिटी, उत्पादन, टयुटोरियल्स, इंजिनिअरिंग, फूड, रिटेल, कम्प्युटर हार्डवेअर अ‍ॅड नेटवर्कींग, हॉस्पिटल्स, सेल्स ऍन्ड मार्केटींग, हॉटेल इंडस्ट्री इत्यादी क्षेत्रातील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत 

प्रमुख मान्यवरांची हजेरी
केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील, ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक आदी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी प्राप्त करण्यासाठी तशा प्रकारचे शिक्षण उमेदवारांनी घ्यावे. शिक्षण घेतल्यानंतर ज्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी प्रशिक्षण उपलब्ध केले जाईल.
-डॉ.संजीव नाईक, आयोजक महारोजगार मेळावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -