घरनवी मुंबईसावित्रीबाई फुलेंच्या त्यागामुळेच आज महिलांच्या सर्वांगिण प्रगतीला गती-आयुक्त राजेश नार्वेकर

सावित्रीबाई फुलेंच्या त्यागामुळेच आज महिलांच्या सर्वांगिण प्रगतीला गती-आयुक्त राजेश नार्वेकर

Subscribe

सावित्रीबाई फुले पुरस्कारासह स्पर्धकांचा सन्मान

नवी मुंबई-: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महिलांच्या विविध गुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी आयोजित स्पर्धेला मिळेला प्रतिसाद हा कौतुकास्पद आहे. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून महिलांच्या विकासासाठी त्यांना स्वावलंबी करण्याच्या अनुषंगाने विविध योजना राबविल्या जात आहेत. शहरातील महिला वर्गाकडून या योजनांना मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे. आगामी कालावधीत देखील महिलांना अधिकाधिक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळेच आज महिलांची सर्वांगिण प्रगती झाली आहे, असे प्रतिपादन पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले. (Birth anniversary of Krantijyoti Savitribai Phule) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पालिकेने विष्णुदास भावे नाट्यगृहात पुरस्कार व स्पर्धेतील महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

याप्रसंगी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ व सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, उपायुक्त मंगला माळवे, पालिका सचिव चित्रा बाविस्कर, समाजसेवा अधिकारी सर्जेराव परांडे आणि माजी नगरसेविका आदी उपस्थित होत्या. आमदार नाईक यांनी महिला सक्षमीकरणासाठी पालिकेच्या योजनांबद्दल प्रशंसा केली. तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरीता पालिकेने स्वतंत्र कक्ष स्थापन करावा, अशी सूचना केली.

रबाळेतील केंद्राला मानाचा पुरस्कार
भिमनगर, रबाळे येथील महिला विकास आणि शिशू संस्कार केंद्राला या वर्षीचा मानाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार आमदार गणेश नाईक यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

- Advertisement -

त्याचप्रमाणे यामध्ये गायन स्पर्धेत मंगला भोई, वेदांती भोई, सोनल जाधव यांना अनुक्रमे तीन क्रमांकाची व प्रिती गजरे, सुजाता माने यांना उत्तेजनार्थ पारितोषिकांनी सन्मानीत करण्यात आले.नृत्य स्पर्धेत १८ ते ३० वयोगटात साक्षी वडजे, वैशाली शेवाळे, सायली भोसले तसेच आकांक्षा पाटील व धनश्री बागर यांना उत्तेजनार्थ आणि नृत्य स्पर्धेच्या ३० वयापुढील गटात मृणाल वानखेडे, गौरी खोबरेकर, छाया कोपरे यांना तसेच निशा सरवदे व सोनिया गुप्ता यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

निबंध स्पर्धेत सारिका जेथे, राजेश्री कांबळे, उषादेवी सुरवाडे तसेच आरती अवचर व प्रतिभा कुंकर यांना उत्तेजनार्थ सॅलेड सजावट स्पर्धेत लक्ष्मी शेळके, मयुरी तांडेल व हर्षाली रानकर, पाककला स्पर्धेत सुनिता खाटपे, धनश्री रानकर, सुचित्रा रेडकर त्याचप्रमाणे टाकाऊपासून टिकाऊ वस्तूनिर्मिती स्पर्धेत प्रभा राव, वृषाली पाटील, मीरा मंडलिक यांना पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.पालिकेच्या आठ विभागनिहाय घेतलेल्या रांगोळी व मेहंदी स्पर्धेतील प्रथम ३ क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येक विभागासाठी तीन व काही उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -