घरनवी मुंबईसफाई मित्रांच्या ‘नमस्ते’ योजनेचा शुभारंभ

सफाई मित्रांच्या ‘नमस्ते’ योजनेचा शुभारंभ

Subscribe

नवी मुंबई-: केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय तसेच गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या वतीने यांत्रिकी स्वच्छ पर्यावरण प्रणालीचा राष्ट्रीय कार्यक्रम ‘नमस्ते’अंतर्गत ‘नमस्ते योजनेकरिता वैयक्तिक माहिती शिबिर’ उपक्रमाचा महाराष्ट्र राज्यस्तरीय शुभारंभ पालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झाला. (Launch of ‘Namaste’ scheme In Nmmc) पालिकेकडे २७२ सफाईमित्र असून नमस्ते योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५३ सफाईमित्रांचा पोर्टफोलिओ तयार केला जाणार आहे.

याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, मलनि:स्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता सुधाकर मोरे तसेच नमस्ते योजनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक प्रियंका गांगुर्डे व सोपान कदम उपस्थित होते.
मलनि:स्सारण व्यवस्थापनाचे काम करणार्‍या सफाई मित्रांना बदलत्या तंत्रज्ञानाचे अद्ययावत प्रशिक्षण देणे, त्यांच्यातील उद्योजकता वाढीसाठी प्रोत्साहन देणे, अर्थसहाय्य देणे तसेच त्यांच्या कुटूंबाचे आरोग्य सुरक्षित करत विमा योजनांचा लाभ देणे अशा विविध गोष्टींचा लाभ सफाई मित्रांना पुरविण्याच्या दृष्टीने नमस्ते योजनेचे हे शिबीर विशेष महत्वाचे असल्याचे गांगुर्डे यांनी सांगितले. पालिकेचे काम चांगले असल्यामुळेच या योजनेचा शुभारंभ नवी मुंबईपासून होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

सर्व सफाई मित्रांना विविध लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांची वैयक्तिक माहिती नमस्ते योजनेच्या विशेष पवर नोंदीत असणे आवश्यक असून त्याकरिता प्रत्येक सफाईमित्राने आपली सत्य व संपूर्ण माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन शहर अभियंता संजय देसाई यांनी केले.

अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांनी केंद्र सरकारने याबाबतचा कायदा करण्याच्या आधीपासूनच नवी मुंबईत यांत्रिकी पद्धतीने सफाई करत असल्याची माहिती देत नमस्ते योजनेमधून सफाईमित्रांचा तयार होणारा केंद्रीय पातळी वरील डाटा बेस त्यांच्यासाठी उपयोगी ठरेल असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -