घरनवी मुंबईपावणे एमआयडीसीत मेहक केमिकल कंपनीला आग

पावणे एमआयडीसीत मेहक केमिकल कंपनीला आग

Subscribe

नवी मुंबई-:  पावणे एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीला सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना
घडली. आग लागल्याचे कळताच कंपनीमध्ये असणार्‍या कर्मचार्‍यांनी तातडीने बाहेर धाव घेतली. काही क्षणातच
केमिकलच्या साठयामुळे आगीचा भडका उडाल्याने परिसरात आगीचे लोळ पसरले होते. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.(fire in Pawne MIDC Mehk Chemical Pvt Ltd)

पावणे एमआयडीसी परिसरातील मेहक केमिकल प्राव्हेट लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे. प्लॉट नंबर डब्लू-५ आणि डब्लू-६ वर ही कंपनी असून गुरुवारी सकाळी ६ च्या सुमारास कंपनीतील एका प्लॅण्टला आग लागली.आग लागण्याची घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाची वाहने तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. सकाळी सहाच्या सुमारास कंपनीमध्ये कर्मचार्‍यांची वर्दळ अल्प होती. काही क्षणातच आगीचा भडका उडाला आणि एकापाठोपाठ एक असे भीषण स्फोट झाले. तर प्रसंगावधान राखून कंपनीमध्ये काम करणार्‍यांनी बाहेर धाव घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

- Advertisement -

आग विझवण्यासाठी पालिकेचे अग्निशमन दलाच ५ गाड्या व एमआयडीसी अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना सुमारे पाच तास लागले. दहा वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आल्यानंतर दिवसभर कुलिंग करण्याचे काम सुरू होते. आगीत
अनुचित घटना घडली नाही. मात्र आगीत कंपनीची मोठी वित्तहानी झाली आहे. आगीचे लोट एवढे मोठे होते की ठाणे-बेलापूर रस्त्यावरून दिसत होते.

या संदर्भात एमआयडीसीचे अग्निशमन दलाचे अधिकारी एस.एल.पाटील म्हणाले की, केमिकल कंपनीला आग कशामुळे लागले याचे कारण अद्यापपर्यत समजू शकले नाही. परंतु आग विझवण्यासाठी सुमारे पाच तास लागले. या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -