घरनवी मुंबईपनवेल मनसेला वाली कोण?; राजकीय वर्तुळात चर्चा

पनवेल मनसेला वाली कोण?; राजकीय वर्तुळात चर्चा

Subscribe

राज्यामध्ये एकीकडे मनसेला जय महाराष्ट्र ठोकून मनसेचे प्रमुख शिलेदार शिवसेना आणि भाजपात प्रवेश करत असल्याने सामान्य मनसैनिक अस्वस्थ झाले आहेत.

राज्यामध्ये एकीकडे मनसेला जय महाराष्ट्र ठोकून मनसेचे प्रमुख शिलेदार शिवसेना आणि भाजपात प्रवेश करत असल्याने सामान्य मनसैनिक अस्वस्थ झाले आहेत. दुसरीकडे मनसेच्या नेत्यांनी पदाधिकारी नेमले नसल्याने संभ्रमावस्थेत आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरात मनसेने अद्यापि पदाधिकारी नेमले नसल्याने आमचा नेता कोण, असा प्रश्न सामान्य मनसैनिकांनी पडला आहे. पनवेल मनसेला वाली कोण?, अशी चर्चा सध्या पनवेलच्या राजकीय पटलावर सुरु आहे. पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन आता चार वर्ष झाली. मात्र अद्यापि पक्षाने पनवेल महानगर अध्यक्ष नेमलेला नाही. मनसेचे पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून अविनाश पडवळ यांच्यावर जबाबदारी आहे. मात्र, अविनाश पडवळ यांचे पनवेलकडे विशेष लक्ष नसल्याची चर्चा सध्या पनवेलमधील कार्यकर्त्यांमध्ये आहे. अविनाश पडवळ हे पनवेल तालुका अध्यक्ष असलेतरी ते उरण विधानसभा क्षेत्रात राहतात.

प्रामुख्याने उरण विधानसभा क्षेत्रातच ते कार्यरत असल्याने त्यांचे पनवेल मध्ये मनसे पक्ष बांधणीत विशेष लक्ष नाही. पनवेल महानगरपालिका होऊन चार वर्ष झाली. मात्र, चार वर्षात पनवेल महानगरावर अध्यक्ष म्हणून नेमण्यात पक्षाला गांभीर्य वाटले नाही. मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांच्या अख्तरीत पनवेल आणि उरण हे दोन विधानसभा क्षेत्र येतात. येथे पक्ष बांधणीसाठी संधी असताना पनवेल महानगर अध्यक्ष नेमण्यात विलंब का होत आहे?, असे मनसैनिक खाजगीत बोलतात.

- Advertisement -

पनवेल महानगर क्षेत्रात खारघर शहर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल येथे मोठ्या प्रमाणात सक्रिय पदाधिकाऱ्यांची टीम मनसेकडे असताना पनवेल महानगरवर पदाधिकारी का नेमले जात नाही, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रवस्था आहे. खारघर शहरात अनेक सक्रिय पदाधिकारी आहेत. खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब, खारघर शहर सचिव संतोष पंडित, पक्षासाठी अनेक केसेस अंगावर घेणारे सुशील विश्वास, कळंबोली अध्यक्ष राहुल चव्हाण, कामोठे अध्यख रोहित दुधवडकर अशी सक्रिय फौज मनसेकडे आहे. मनसेचे नवीन पनवेल उपाअध्यक्ष ऍड संतोष सरगर यांना तर पनवेल महापालिका निवडणुकीत सुमारे दोन हजार मते मिळाली आहेत. पनवेल मनपा निवडणुकीत मनसेच्या उमेद्वारांपैकी सर्वात जास्त मते संतोष सरगर यांना आहेत. मात्र तरी देखील पनवेल महानगर अध्यक्ष नेमण्यात पक्षाच्या नेत्यांना स्वारस्य का नाही?, असा प्रश्न मनसैनिकांना पडला आहे. पनवेल आणि उरण विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करणारे मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांनी पनवेलमध्ये पक्ष वाढीसाठी पनवेल महानगर अध्यक्ष नेमण्याबाबत तातडीने पाऊले उचलावीत, अशी भावना पनवेल मधील मनसैनिकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा –

पनवेल मनसेला वाली कोण?; राजकीय वर्तुळात चर्चा
Sanjay Mahadikhttps://www.mymahanagar.com/author/sanjay-mahadik/
गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. प्रिंट, टीव्ही, डिजिटल मीडियाचा अनुभव. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -