घरनवी मुंबईमांडव्याजवळ रो-रोतून प्रवाशाने मारली उडी

मांडव्याजवळ रो-रोतून प्रवाशाने मारली उडी

Subscribe

पोलिसांकडून इसमाचा शोध सुरु

अलिबाग-:
मांडवा ते भाऊचा धक्का या रो रो प्रवासी बोटीने (Ro Ro passenger boats) दरम्यान आज सोमवारी मांडवा जेट्टीजवळ सकाळी मोठी घटना घडली. रो-रो बोटीतून प्रवास करताना एका प्रवाशाने समुद्रात उडी मारली. या घटनेने एकच खळबळ उडाली. समुद्रात उडी मारणार्‍या प्रवाशाचा पोलिसांकडून शोध घेण्याचे काम सुरु आहे.

या घटनेची माहिती मिळताच मांडवा सागरी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक गोविंद पाटील यांनी मांडवा जेट्टीवर धाव घेऊ शोध पथकाच्या माध्यमातून प्रवाशाला शोधण्यास सुरुवात मात्र दुपारपर्यत त्याचा शोध लागला नाही.
रो-रो सेवेसाठी ग्रीसहून आणलेल्या जहाजाची चाचणी यशस्वी झाली आहे. एकावेळी एक हजार प्रवासी आणि २०० गाडया वाहून नेण्याची क्षमता या जहाजाची आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने ३१ कोटी रुपये खर्च करुन या सेवेसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत.

- Advertisement -

रो-पॅक्स प्रकल्पा अंतर्गत महाराष्ट्र सागरी मंडळाने मांडव्यात पायाभूत सुविधा विकसित केल्या. या कामांवर १३५ कोटी खर्च झाले आहेत. मात्र अशा अपघातामुळे रो रो सेवेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -