घरनवी मुंबईकोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून पालिकेने केली २ लाखांची दंडवसुली

कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून पालिकेने केली २ लाखांची दंडवसुली

Subscribe

ख्रिसमस व आगामी नववर्ष साजरे करताना नागरिकांनी कोविड बाधितांची दैनंदिन वाढती संख्या आणि ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन हे सण, उत्सव साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.

ख्रिसमस व आगामी नववर्ष साजरे करताना नागरिकांनी कोविड बाधितांची दैनंदिन वाढती संख्या आणि ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन हे सण, उत्सव साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले असून कोरोना प्रतिबंधक नियमांचे नागरिकांकडून काटेकोर पालन केले जात असल्याबाबत अत्यंत सतर्क राहण्याचे निर्देश महापालिकेच्या विशेष दक्षता पथकांना देण्यात आले आहेत. या अनुषंगाने विभाग कार्यालय स्तरावरील दक्षता पथकांनी तसेच मुख्यालय स्तरावरील विशेष दक्षता पथकांनी विविध समारंभ स्थळे, सार्वजनिक जागा, आस्थापना येथे अचानक भेटी देत कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिक, आस्थापना यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

यामध्ये मास्क न वापरणार्‍या नागरिकांकडून १ लाख ४५ हजार ५०० इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली असून सुरक्षित अंतर नियमावलीचे उल्लंघन करणार्‍या नागरिक, आस्थापनांकडून २० हजार ६०० इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. याशिवाय कोविड नियमावलीचे उल्लंघन करणार्‍या आस्थापनांकडून १ लाख १५ हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे शनिवारी ख्रिसमस व त्यानंतरचा रविवार अशा २ दिवसात एकूण २ लाख ८१ हजार १०० इतका दंड महापालिकेच्या दक्षता पथकांनी वसूल केला आहे.

- Advertisement -

यामध्ये वाशी विभागात सेक्टर ३० ए येथील इनॉर्बिट येथील केएफसी सफायर फुड्स येथे ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त उपस्थिती असल्याने ५० हजार रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच हार्ड केसल (मॅकडोनल्ड्स) यांच्याकडून १५ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मराठी साहित्य संस्कृती मंडळ सेक्टर ६ (५००० रुपये), ब्लू इम्पिरियल बेंक्वेट हॉल (१०००० रुपये), साई पॅरेडाईज बेक्वेंट हॉल (१५००० रुपये), आएशा सलून (२००० रुपये), एनएमएसए बेक्वेट हॉल (२५०० रुपये), बंगाली असोसिएशन हॉल (१५०० रुपये), तुंगा बेक्वेट हॉल (६००० रुपये), मर्चंट जिमखाना बेक्वेट हॉल (२५०० रुपये) अशा विविध समारंभ, शुभविवाह स्थळे याठिकाणीही काटेकोर लक्ष ठेवून मास्क न वापरल्याबाबत दंडात्मक वसूली करण्यात आलेली आहे. बेलापूर विभागामध्ये सेक्टर ४२ येथील अपना बाजार, चारभुजा स्विट्स, तिरुपती डोसा या आस्थापनांकडून प्रत्येकी १० हजार रुपये असा एकूण ३० हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.

ऐरोली विभागामध्ये सेक्टर १५ येथील हेगडे भवन सभागृहात कोव्हीड नियमांचे उल्लंघन झाल्यापोटी १० हजार रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. तुर्भे विभागामध्येही मॅफको मार्केट येथील नरेंद्र वाईन्स या आस्थापनेकडून १० हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. अशाच प्रकारे मुख्यालय स्तरावरील विशेष पथकांनी सेक्टर १४ कोपरखैरणे येथील पंजाब चायनीज तसेच सेक्टर १४ बेलापूर येथील राधा कृष्ण डेअरी या आस्थापना रात्री १२ नंतरही सुरु असल्याचे आढळल्याने कोविड प्रतिबंधात्मक नियमावली अंतर्गत प्रत्येकी १० हजार रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

ठाणे हादरले! अपहरण झालेल्या बाळाचा मृतदेह ड्रममध्ये आढळल्याने खळबळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -