घरनवी मुंबईNavi mumbai Metro : सिडकोने केले 'नवी मुंबई मेट्रो'च्या वेळेत बदल

Navi mumbai Metro : सिडकोने केले ‘नवी मुंबई मेट्रो’च्या वेळेत बदल

Subscribe

सिडकोच्या या निर्णयामुळे बेलापूर ते पेंधर येथील प्रवासी चाकरमनींना विशेषत: रात्रीच्यावेळी घर गाठण्यासाठी गाडया बदलत आणि खाजगी वाहनांचा आधार घेत करावा लागणारा कसरतीचा प्रवास दूर होणार आहे.

नवी मुंबई : ‘नवी मुंबई मेट्रो’ मार्ग-१ मार्गातील बेलापूर ते पेंधर सेवे दरम्यान धावणार्‍या नवी मुंबई मेट्रो रेल्वेच्या सेवा वेळेमध्ये येत्या सोमवार ८ एप्रिलपासून वाढ करण्याचा निर्णय सिडको महामंडळ तर्फे घेण्यात आला आहे.मेट्रो रेल्वेच्या वेळेत वाढ झाल्यावर या मेट्रो रेल्वेमधून प्रवास करणार्‍या खारघर आणि तळोजामधील प्रवाशांना रात्रीच्यावेळी घर गाठण्यासाठी करावी लागणारी कसरत दूर होणार आहे. (Navi mumbai metro train change timetable from mondy 8 April)

सिडकोच्या निर्णयानुसार बेलापूर मेट्रो स्थानक येथून सुटणार्‍या ‘मेट्रो रेल्वे’च्या सेवा वेळेत १ तासाची तर पेंधर येथून सुटणार्‍या मेट्रो रेल्वेच्या सेवा वेळेत अर्ध्या तासाची वाढ करण्यात येणार आहे. आठवड्यातील सर्व दिवशी वाढीव सेवा वेळेनुसार नवी मुंबई मेट्रो रेल्वे धावणार आहे. बेलापूर ते पेंधर वर धावणार्‍या मेट्रोच्या सेवा वेळेमध्ये वाढ करण्यात आल्यानंतर बेलापूर मेट्रो स्थानक येथून सकाळी ६ वाजता पहिली मेट्रो पेंधरच्या दिशेने व पेंधर येथून बेलापूरच्या दिशेने रवाना होईल. बेलापूर मेट्रो स्थानक येथून शेवटची मेट्रो रात्री ११ वाजता पेंधरच्या दिशेने रवाना होईल तर पेंधर मेट्रो स्थानक येथून शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता बेलापूरच्या दिशेने रवाना होईल, असे सिडकोने कळविले आहे.

- Advertisement -

हेही वाचा…Mumbai Local Train : फुकट्या प्रवाशांवरील कारवाईत मध्य रेल्वे अव्वल

नवी मुंबई मेट्रो रेल्वे सेवा सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सुरु राहत आहे. रात्री १० नंतर खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा मार्गांवर बस सेवा वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे खारघर सेक्टर-३४, ३५ तसेच तळोजा मधील प्रवाशांना रात्री १० नंतर खाजगी वाहने अथवा रिक्षाने प्रवास करताना दुपट पैसे मोजावे लागत आहेत. प्रशासनाने रात्री १२ पर्यंत नवी मुंबई मेट्रो रेल्वे सेवा सुरु ठेवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.सिडकोच्या या निर्णयामुळे बेलापूर ते पेंधर येथील प्रवासी चाकरमनींना विशेषत: रात्रीच्यावेळी घर गाठण्यासाठी गाडया बदलत आणि खाजगी वाहनांचा आधार घेत करावा लागणारा कसरतीचा प्रवास दूर होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -