घरताज्या घडामोडीMumbai Local Train : फुकट्या प्रवाशांवरील कारवाईत मध्य रेल्वे अव्वल

Mumbai Local Train : फुकट्या प्रवाशांवरील कारवाईत मध्य रेल्वे अव्वल

Subscribe

रेल्वे प्रवास करताना विनातिकीट प्रवास करू नका अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असे वारंवार रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र रेल्वेच्या सर्व नियमांचे उल्लंघन करत प्रवासी प्रवास करत असतात. यामध्ये गर्दीचा फायदा घेत अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत असतात. याच प्रवाशांवर आळा घालण्यासाठी आणि दंडात्म कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे.

मुंबई : रेल्वे प्रवास करताना विनातिकीट प्रवास करू नका अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असे वारंवार रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र रेल्वेच्या सर्व नियमांचे उल्लंघन करत प्रवासी प्रवास करत असतात. यामध्ये गर्दीचा फायदा घेत अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत असतात. याच प्रवाशांवर आळा घालण्यासाठी आणि दंडात्म कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४६.२६ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत ३०० कोटी रुपयांची वसूली केली आहे. शिवाय, फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात मध्य रेल्वे अव्वल स्थानावर आहे. (Mumbai Local Train Central Railway Recovered 300 crore From Without Ticket Passengers)

मध्य रेल्वे प्रशानाने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ म्हणजेच एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेने विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या अशा ४६.२६ लाख प्रवाशांवर कारवाईत करत त्यांच्याकडून ३०० कोटी रुपयांची वसूली केली आहे. याशिवाय, मध्य रेल्वेने २६५.९७ कोटी महसुलाच्या बाबतीत या वर्षी १२.८० लाख टक्क्याने ओलांडले आहे. तसेच, एकूण ४२.६३ लाख प्रकरणांमध्ये ८.३८ लाख टक्के लक्ष्य पार केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – AC Local Train Fare : उकाडा वाढताच AC लोकलची भरभराट; एकाच दिवसात इतक्या पासांची…

प्रवासी संख्या आणि प्राप्त केलेला महसूल यांचा विभागनिहाय तपशील

- Advertisement -
  • मुंबई विभागात २०.५६ लाख प्रकरणांमधून ११५.२९ कोटी रुपये प्राप्त केले.
  • भुसावळ विभागातील ८.३४ लाख प्रकरणांमधून ६६.३३ कोटी रुपये प्राप्त केले.
  • नागपूर विभागात ५.७० लाख प्रकरणांमधून ३४.५२ कोटी रुपये प्राप्त केले.
  • सोलापूर विभागातील ५.४४ लाख प्रकरणांमधून ३४.७४ कोटी रुपये प्राप्त केले.
  • पुणे विभाग ३.७४ लाख प्रकरणांमधून २८.१५ कोटी रुपये प्राप्त केले.
  • मुख्यालय २.४७ लाख प्रकरणांमधून २०.९६ कोटी रुपये.

मध्य रेल्वेकडे दोन महिला वरिष्ठ तिकीट परीक्षकाचा समावेश असून २२ तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्यांनी तिकीट तपासणीच्या उत्पन्नात वैयक्तिकरित्या १ कोटी रुपयांपेक्षा जास्त योगदान दिले आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सुखर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वे करीत आहे.


हेही वाचा – Mega Block News : प्रवाशांनो सावधान! मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -