घरनवी मुंबईभाजपाच्या जनसंवाद-सुसंवादाला युवक काँग्रेसचे ’परिवर्तन’ सभेतून उत्तर

भाजपाच्या जनसंवाद-सुसंवादाला युवक काँग्रेसचे ’परिवर्तन’ सभेतून उत्तर

Subscribe

वाशीत शुक्रवारी सभा; माजी मुख्यमंत्र्यासह जेष्ठ नेते उपस्थित राहणार भारतीय जनता पार्टी ही इव्हेंट पार्टी आहे. नवी मुंबईतही भाजपा आमदार जनसंवाद तसेच सुसंवाद असे इव्हेंट कार्यक्रम घेत आहे. जनतेच्या प्रश्नी भाजपाचे नेते चार वर्ष झोपले होते का? असा प्रश्न युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी केला आहे. नवी मुंबईकरांना मुबलक पिण्याचे पाणी मिळत नाही, कोलमडलेली आरोग्य यंत्रणा, वाढती बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अंधातरी आहेत. त्यामुळे परिवर्तनाचा शंखनाद करुन जनसंवाद व सुसंवादाला उत्तर देणार असल्याचे म्हात्रे म्हणाले.

नवी मुंबई-: भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यापासून देशाची प्रगती नाही तर अधोगतीकडे वाटचाल सुरु झाली आहे. भाजपाची एकलशाही मोडीत काढण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ’इंडिया आघाडी’ संघटीत केली आहे.त्यामुळे भाजपाला धडकी भरली आहे. केंद्रा प्रमाणे राज्यातही शिंदे-फडणवीस-पवार या खिचडी सरकारने महाराष्ट्राला रसातळाला नेले आहे. सर्व सामान्यांची खदखद दूर करुन जनतेला न्याय देण्यासाठी नवी मुंबई जिल्हा युवक काँगे्रसच्या (Navumumbai Youth Congress) माध्यमातून वाशीतील विष्णुदास भावे नाटय गृहात येत्या शुक्रवार १३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी चार वाजता परिवर्तन  सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिवर्तन सभेची माहिती देण्यासाठी वाशीतील काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अनिकेत म्हात्रे (युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष), अनिल कौशिक, (जिल्हाध्यक्ष), माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, काँग्रेसचे शहर प्रवक्ते रवींद्र सावंत, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदेश सावंत, तुर्भे ब्लॉक अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, मल्हार देशमुख आदी उपस्थित होते.

- Advertisement -

वाशीत होणार्‍या परिवर्तन सभेला युवक कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही.श्रीनिवास, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री नसीम खान, विश्वजीत कदम, आमदार संग्राम थोपटे, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत उपस्थित राहणार आहेत.

केंद्रातील भाजपा सरकारच्या जुमलेबाजीला आणि राज्यातही खिचडी सरकार पोकळ आश्वासनाला आता जनता कंटाळली आहे.त्यामुळे आता जनतेला काँग्रेसच्या माध्यमातून परिवर्तन हवे आहे. त्यामुळे युवक काँग्रेसच्यावतीने सर्व सामान्य नागरिक, तरुणांमध्ये प्रबोधन करण्यासाठी परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले असून केंद्र, राज्य व नवी मुंबईतील भाजपाचा भुमिकेचा यात समाचार घेतला जाणार असल्याचे अनिल कौशिक म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -