घरनवी मुंबईरेल्वेरुळ ओलांडताना १२७ जणांचा मृत्यू; ट्रान्स हार्बर मार्गावर शॉर्टकट मार्ग बंद

रेल्वेरुळ ओलांडताना १२७ जणांचा मृत्यू; ट्रान्स हार्बर मार्गावर शॉर्टकट मार्ग बंद

Subscribe

या कारणामुळे होतात अपघात@ हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरुन मुंबई आणि ठाण्याकडे जाणारे प्रवासी एखादी चुकल्यास किंवा पळत जाऊन गाडी पकडण्यासाठी एका फलाटावरुन दुसर्‍या फलाटावर जाण्याकरीता स्थानकात भुयारी मार्ग आणि पुल असताना देखील शॉर्टकटचा मार्ग म्हणून रेल्वेरुळ ओलांडतात. तर अनेक जण आलेल्या लोकलमधून धावत दुसर्‍या फलाटावर जातात. यावेळी गाडी चालू झाल्याने प्रवासी उडी मारतात. मात्र हाच शॉर्टकट १२७ प्रवाशांच्या जीवावर बेतला आहे.

नवी मुंबई-: सीएसटी-ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरुन प्रवास करणारे प्रवासी रेल्वे स्थानकातून फलाटावर जाण्यासाठी रेल्वे ट्रॅक ओलांडून शॉर्टकट मार्गाचा वापर करतात. मात्र हाच शॉर्टकट जीवघेणा ठरला आहे. मागील वर्षभरात तब्बल १२७ जणांना रेल्वेरूळ ओलांडताना आपला मौल्यवान जीव गमावावा लागला आहे. तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.(Shortcut route closed on Trans Harbor route) वाढते अपघात लक्षात घेता रेल्वेने फलाटाच्या दोन्ही बाजूला रेलिंग बसवण्याची मोहिम हाती घेतली आहे. तर प्रवाशांना पादचारी पुलाचा वापर करा, आपला प्रवासा सुखाचा करा, असे आवाहन केले आहे.

नवी मुंबईतील वाशी लोहमार्ग व पनवेल लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे मार्गावर गत २०२३ या वर्षात विविध अपघातामध्ये एकूण २२१ जणांना मृत्यू झाला आहे. यात तब्बल १२७ जणांना रेल्वे रूळ ओलांडताना अपघाती मृत्यू झाला आहे. यात वाशी लोहमार्ग हद्दीत विविध अपघाती १५० जणांच्या मृत्युची नोंद असून त्यामध्ये रेल्वेरूळ ओलांडताना ९६ जणांचा मृत्यू झाला आहे.प्रवास करताना लोकलमधून पडून ३२ जणांचा, फलाट व गाडीच्या गॅपमध्ये पडून ३ जणांचा तर खांबाला धडकून दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातात १२४ जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

त्याच प्रमाणे पनवेल लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील वर्षी विविध अपघातामध्ये ७१ जणांचा मृत्यू झाला असून रेल्वेरूळ ओलांडताना ३१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.लोकलमधून पडून १० इसमाचा तर ६१ जणांना गंभीर दुखापत झाली आहे.

रेल्वेरुळ ओलांडू नका, दंड आकारला जाईल, अशा आशयाचे फलक देखील स्थानकात बसविण्यात आले आहेत. मात्र याकडे प्रवासी पाहत देखील नाहीत. शॉर्टकट म्हणून वापर करणार्‍या फलाटावरील दोन्ही दिशेला आता लोखंडी जाळया बसवण्यात आल्या आहेत. कोपरखैरणे, जुईनगर, वाशी, सीवूडस, बेलापूर, मानसरोवर या ठिकाणी या जाळया बसवून शॉर्टकट मार्ग बंद करण्यात आले असून येत्या काही दिवसात सर्वच स्थानकात अशा प्रकारे रेलिंग बसवले जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -