घरनवी मुंबईभाजपाचे "लक्ष्य" लोकसहभागातून विकासाकडे!

भाजपाचे “लक्ष्य” लोकसहभागातून विकासाकडे!

Subscribe

जनतेच्या सूचनेतून भाजपाचा ठाणे लोकसभेचा जाहिरनामा

नवी मुंबई-: नवी मुंबई शहरात भाजपाचा जोर वाढला आहे. बेलापूर व ऐरोली हे दोन मतदार संघ भाजपाच्या हाती आहेत. मात्र दोन टर्म शिवसेनेचे (उबाठा) खा.राजन विचारे यांच्याकडे असणारा ठाणे लोकसभा मतदार संघ पुन्हा आपल्या हाती आणण्यासाठी भाजपामय झालेले माजी खासदार डॉ.संजीव नाईक यांनी मोर्चे बांधणी सुरु केली असल्याचे चित्र दिसत आहे. ( Thane Lok Sabha manifesto from BJP will be prepared through public participation) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने ठाणे लोकसभा मतदार संघाचा निवडणूक जाहीरनामा तयार करण्यासाठी नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत. या संदर्भातील पोर्टलचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी करण्यात आले.

या विषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला ठाणे लोकसभेचे संयोजक विनय सहस्रबुध्दे, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, जिल्हा महामंत्री अनंत सुतार, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, शशिकांत राऊत, बेलापूर विधानसभा निवडणूक प्रमुख निलेश म्हात्रे, नेत्रा शिर्के, सतीश निकम, अरुण पडते आदी उपस्थित होते.

- Advertisement -

पोर्टलवर अभिनव संकल्पना, सूचना सादर करा
ठाणे व नवी मुंबई, मीरा-भाईंदर या नावाजेल्या महापालिका ठाणे लोकसभा मतदार संघात येतात. मीरा-भाईंदर, ठाणे, नवी मुंबई ही शहरे मुंबईला दळणवळणाने जोडण्यासाठी केंद्र बिंदू ठरली आहेत.वाढत्या उद्योगांमुळे त्यांचे जागतिक महत्त्व वाढल्याने त्यांच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. त्याच दृष्टीने ठाणे लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक जाहीरनामा तयार करण्याकरीता नागरिकांकडून सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती सहस्त्रबुध्दे यांनी दिली. या संदर्भातील www.thaneloksabha.in पोर्टलवर तिन्ही शहरातील नागरिकांनी आपले विचार, अभिनव संकल्पना, सूचना सादर करण्याचे आवाहनही सहस्रबुद्धे यांनी केले आहे.

भाजप हा विकासाला प्राधान्य देत जनतेची कामे करणारा पक्ष आहे, असे माजी खासदार डॉ.नाईक यावेळी म्हणाले. तर ठाणे लोकसभेचा जाहिरनामा हा जनतेच्या संकल्पना सूचनांचा समावेश असणारा असून नागरिकांनी आपल्याला अपेक्षित संकल्पना मांडव्यात, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संदीप नाईक व डॉ.नाईक यांनी केले आहे. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -