घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनगर-पुणे महामार्गावरील भीषण अपघातात ४ ठार

नगर-पुणे महामार्गावरील भीषण अपघातात ४ ठार

Subscribe

मृतांमध्ये वडील अन् मुलाचा समावेश; जातेगाव शिवारातील घटना

दोन मालवाहू ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या भीषणअपघातात वडील आणि मुलासह ४ जण जागीच ठार झाले असल्याची दुर्दैवी घटना सोमवारी नगर-पुणे महामार्गावर घडली. मृतांमध्ये दोन दुचाकी स्वार आणि त्याच्या सहायकाचा समावेश होता. अपघात एवढा भीषण होता की,अपघातग्रस्त दुचाकीचे चालक आणि सहायक हे दुचाकीच्या समोरच्या बाजूला लटकत होते. तर दुचाकीसह दोन्ही दुचाकीस्वार अक्षरश चिरडले गेले होते.

या अपघातात मालट्रक चालक शुभम राजू देशभ्रतार (वय२ ४, रा. दुधाडा, ता कटोल, जि. नागपूर),सहायक राहुल मधुकर डोंगरे (वय ३१,रा. सावली, ता. कारंजा ,जि.वर्धा)या दोघांसह दुचाकीवरील राजाभाऊ विष्णू चव्हाण (वय ५०,रा. जातेगाव,ता. गेवराई, बीड) व त्यांचा मुलगा पुरुषोत्तम (वय १८) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अपघातासंदर्भात माहिती अशी की, जे. के. ट्रान्सपोर्ट व के. टी. ट्रान्सपोर्ट कंपनीच्या दोन मालट्रक एकामागोमाग एक पुण्याहून नगरच्या दिशेने निघाल्या होत्या. प्लास्टिक उत्पादनाचा कच्चा माल घेऊन निघालेल्या के. टी. कंपनीच्या माल ट्रकचा (एमएच ४० एके २५६३) मागचा टायर फुटल्याने या ट्रकच्या चालकाने अचानक गाडी थांबवली. या ट्रकच्या पाठीमागे दुचाकी चालली होती. तर दुचाकीच्या मागे लोखंडी पाईप भरलेला ट्रक भरधाव वेगात येत होता. पुढचा ट्रक थांबल्याने मागील माल ट्रकच्या चालकाने गाडीचा जोरात ब्रेक दाबला त्या धक्क्याने ट्रकमधील लोखंडी पाईप ट्रकचालकाच्या केबीनमध्ये शिरले. केबीन फोडून बाहेर आलेल्या स्टेअरिंगला चालकाचा मृतदेह लटकत होता तर सहायक चालकाचा मृतदेह केबीनमध्ये शिरलेल्या लोखंडी पाईपला लटकत होता. हा ट्रक तशाच अवस्थेत दुचाकी व दुचाकीवरील दोघांना चिरडत समोरच्या ट्रकला मागून धडकला.

- Advertisement -

अपघाताची माहिती मिळताच सुपे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन गोकावे पथकासह घटनास्थळी पोहोचले व क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त मालट्रक रस्त्याच्या बाजूला काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत के. टी. कंपनीच्या ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -