घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रहंडाभर गुप्तधन चर्चेमुळे गमावले

हंडाभर गुप्तधन चर्चेमुळे गमावले

Subscribe

हिस्सा न मिळाल्याने फुटले बिंग

श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूर गावात घराचे खोदकाम करताना कामगारांना हंडाभर गुप्तधन सापडले. मालकाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने मजुरांनी बिंग फोडले. त्यानंतर गुप्तधनाचा गावभर नव्हे जिल्हाभर बोभाटा झाला. पोलीस आणि तहसिलदारांनी घटनास्थळी येत सोने व चांदीने भरलेला हंडा ताब्यात घेतला आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात बेलापुर गावात जुनी व मोठी बाजारपेठ होती. त्यावेळी काळी धन हे सोन्याच्या स्वरुपात जमा करुन जमिनीत पुरुन ठेवले जात होते. गावात अनेक जुने वाडे आहेत. अशाच एका जागेचे खोदकाम काही मजूर करत होते. त्यांना खोदकाम करताना काहीतरी वस्तू असल्याचे दिसले. त्यांनी ती वस्तू बाहेर काढली असता एक हंडा निघाला. त्यात बरेच सोने व चांदी होती. तो हांडा कामगारांनी घरमालकाला दिला. याबाबत खोदाकाम करणारांना काही अमिष दाखविण्यात आले होते. मात्र, ते आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे मजुरांनी बिंग फोडले. या गुप्तधनाचा गावभर नव्हे जिल्हाभर बोभाटा झाला. संबधितांनी या ठिकाणी चांदी सापडली असल्याचा जिल्हाधिकारी यांना कळविले. काही चांदी घेवुन संबधित व्यक्ती अहमदनगरला गेले आहेत. मात्र, जिल्हाधिकारी हे पुरातत्व विभागाला आदेश करतील. त्यानंतर महसूल अधिका़र्‍यांच्या उपस्थितीत त्याचा पंचनामा करुन ते धन महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे एका अधिकार्‍यांने सांगितले.

- Advertisement -

१४ दिवसांपूर्वीच सापडले गुप्तधन

बेलापूरमध्ये खोदकामात १४ दिवसांपूर्वीच गुप्तधन सापडले होते. इतक्या दिवस सर्वजण गप्प का होते, याची सखोल चौकशी झाल्यानंतर बरेच काही मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. हंड्यात फक्त चांदी असल्याचाच दावा करण्यात येत आहे. या गुप्तधनाची चर्चा झाल्यानंतर पोलीसही सावध झाले असून, त्यांनीही चौकशी सुरु केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -