घरपालघरइमारतीवरून पडून कामगारांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल

इमारतीवरून पडून कामगारांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल

Subscribe

तर त्याठिकाणी बांधकाम सुरू असताना बिल्डरांनी कुठलीच सुरक्षा जसे की कामगाराला हेल्मेट, सेफ्टी बेल्ट व कामाच्या ठिकाणी पहिल्या मजल्यावर जाळी लावली नव्हती. तसेच एकीकडे शहरात मोठ्या प्रमाणात नवीन टोलेजंग इमारतीचे बांधकाम होत आहे.

भाईंदर :- काशीगाव येथे निलकमल नाका येथे एका वादग्रस्त एनिमी ( शत्रू) जमिनीवर इमारत बांधण्याचे काम सुरू असताना त्याठिकाणी एक कामगार पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावरून काशीगाव पोलीस ठाण्यात बिल्डर आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यात कामगार आयुक्त आणि पालिका अधिकार्‍यांवरही त्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी बांधकाम कामगार युनियनने केली आहे.
काशीगाव येथे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना त्यावरून पाणी मारताना दुसर्‍या मजल्यावरून पडून कामगार मोहम्मद सलीम (वय ४५ वर्ष) याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मालक व बिल्डर आनंद अग्रवाल व इतर भागीदार आणि ठेकेदार के.पी. बिल्डकॉन वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याठिकाणी बांधकाम सुरू असताना बिल्डरांनी कुठलीच सुरक्षा जसे की कामगाराला हेल्मेट, सेफ्टी बेल्ट व कामाच्या ठिकाणी पहिल्या मजल्यावर जाळी लावली नव्हती. तसेच एकीकडे शहरात मोठ्या प्रमाणात नवीन टोलेजंग इमारतीचे बांधकाम होत आहे.

मात्र त्याठिकाणी सुरक्षा व्यवस्थेची कुठलीच खबरदारी घेतली जात नाही. तसेच कामगार आयुक्त (ठाणे) यांच्याकडील अधिकारी यांच्यासोबत आर्थिक हितसंबंध असल्याने कुठलाच अधिकारी कोणत्याही नवनिर्माणाधिन कामावर जाऊन पाहणी करत नाहीत. यामुळे कामगार वार्‍यावर आहेत,असा देखील आरोप होत आहे. यामुळे महापालिका, कामगार आयुक्त यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी बनवावे अशी मागणी नाका कामगार युनियनचे सादिक बाशा आणि बांधकाम कामगार युनियनचे अध्यक्ष के. नारायण यांनी केली आहे. सदर घटनेनंतर काशीगाव पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे कामगारांना कामावर लावून त्यांना कुठलीच सुरक्षा न-पुरविल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय साठे हे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -