घरपालघरमनोर ते आंबोली हद्दीत झालेल्या अपघातांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ

मनोर ते आंबोली हद्दीत झालेल्या अपघातांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ

Subscribe

कासा पोलीस ठाणे अंतर्गत मनोर- चारोटी ते आंबोली दरम्यान सध्या काम सुरू असुन वाहनचालक हे गोंधळत वाहन चालवीत असून मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

डहाणू : मुंबई- अहमदाबाद महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याचाच एक अपघात तपशील हा कासा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या महामार्गावरील पाहिला असता गेल्या एक वर्षापासून ते आतापर्यंतचे अपघात तपशील त्यात मृत्यूचे आकडे , जखमी , आणि गाड्या आगीत भस्मसात जळाल्याची आकडेवारीमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे आढळून आले आहे.ही आकडेवारी फक्त कासा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या महामार्गावरील असून इतर हद्दीतील तपासली तर खूप मोठी आकडेवारी समोर येण्याची संभावना आहे. त्यातच सध्या मुंबई- अहमदाबाद महामार्गावर काॅंक्रिटीकरणाचे काम सुरु असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. कासा पोलीस ठाणे अंतर्गत मनोर- चारोटी ते आंबोली दरम्यान सध्या काम सुरू असुन वाहनचालक हे गोंधळत वाहन चालवीत असून मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

महामार्ग प्रशासन व ठेकेदार यांनी कोणतेही नियोजन न करता काॅंक्रिटीकरण सुरू आहे. यामुळे काही ठिकाणीं दोन लेन वर काम सुरु असून एक लेन वर वाहतूक सुरू असते. तर अनेक ठिकाणीं उलट बाजूच्या लेन वर सुद्धा वाहने चालवली जातात. यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे. चारोटि उड्डाणपूलाखाली असलेल्या सेवा रस्त्यावर अपघात झालेल्या गाड्यांचे जणू काही गोडाऊन बनले आहे. दिवस आड काठी एक अपघात ग्रस्त वाहन हे टोयिंग करून या ठिकाणी ठेवले जात आहे. त्यामुळे येथील सेवा रस्ता म्हणजे अपघात झालेल्या गाड्यांचे गोडाऊन बनले आहे. चारोटी उड्डाण पूल, महालक्ष्मी, धानीवरी दरम्यान दररोज रात्रीच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होते. यासाठी उपाय योजना, व्यवस्थित नियोजन करून हे काम सुरु केले पाहिजे. या वाहतूक कोंडीत अनेक नागरिक अडकून त्रासले आहेत.त्यात बरेच अपघात घडले असून नाहक अपघातात बळी गेले आहेत.

- Advertisement -

अपघात मृत्यू /बळी संख्या – ४३
किरकोळ अपघात – २४
इतर अपघात – २२
गाड्या जळून नुकसान अपघात – ५
एकूण आकडेवारी संख्या – ८९.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -