घरपालघरअनधिकृत रेती उत्खनन करणार्‍या एकूण ४ बोटी जप्त

अनधिकृत रेती उत्खनन करणार्‍या एकूण ४ बोटी जप्त

Subscribe

मंगळवारी खनिकर्म अधिकारी व मंडळ अधिकार्‍यांच्या संयुक्त पथकमे काशिदकोपर किनार्‍यावर छापा घातला.

वसई: वसई- विरारच्या किनारपट्टीवर मंगळवारी जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि भरारी पथकाने संयुक्त कारवाई करून विरार जवळील काशीद कोपर येथे अनधिकृत रेती उत्खनन करणार्‍या एकूण ४ बोटी जप्त केल्या. त्यानंतर या बोटी आणि सक्शन पंप जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या.भरारी पथकातील जिल्हा खनिकर्म अधिकारी संदीप पाटील, अधिकार शुल्क निरीक्षक मारोती सुर्यवंशी, मंडळ अधिकारी सुशांत ठाकरे विजयकुमार मींड, विलास पाटील, अनिकेत काळेल आदींच्या पथकाने ही कारवाई केली. विरार जवळील भागात वैतरणा व शिरगाव, नारिंगी खाड्यांमध्ये छुप्या मार्गाने सक्शन पंप लावून वाळू उपसा होत असतो. या भागत वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत. मंगळवारी खनिकर्म अधिकारी व मंडळ अधिकार्‍यांच्या संयुक्त पथकमे काशिदकोपर किनार्‍यावर छापा घातला.

त्यावेळी वाळू माफिया फरार झाले. मात्र पथकाने अनधिकृत रेती उत्खनन करणार्‍या ४ बोटी जप्त केल्या. या ४ बोटी आणि वाळू उत्खनन करण्यासाठी वापरला जाणारा सक्शन पंप जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट करून नष्ट करण्यात आल्या. किनारपट्टीच्या लगत व खाडी किनारी मोठ्या प्रमाणात कांदळवने आहेत. यामुळे किनार्‍यावरील जैवविविधता व पर्यावरण संतुलन होण्यास मदत होते. मात्र मागील काही वर्षापासून या किनारपट्टीलगत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा केला जाऊ लागला आहे. विरार जवळील वैतरणा खाडीतही मागील काही वर्षांपासून छुप्या मार्गांने बेकायदेशीर वाळू उत्खनन केले जाते. सक्शन पंप लावून हे उत्खनन होत असल्याने हळू हळू खाडी जवळील भाग खचू लागला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -