घरठाणेपावसाळ्यापूर्वी विकास कामे पूर्ण करा-आयुक्त

पावसाळ्यापूर्वी विकास कामे पूर्ण करा-आयुक्त

Subscribe

उल्हासनगर। गुढीपाडवा आणि चेटीचंद, ईद, भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती हे सर्व उत्सव सुरु असताना शहरात विविध योजना अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते, गटर, नाले, मलनिःस्सारणाच्या विकास कामांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि त्यांची गैरसोय लक्षात घेऊन उल्हासनगर मनपा आयुक्त अजीज शेख यांनी विकास कामांचा आढावा घेऊन पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचा आदेश सबंधित अधिकर्‍यांना दिले.

शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदल्यामुळे नागरिकांना रहदारीस अडथळा होत आहे. शिवाय धुळीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. ही बाब चिंताजनक असून नागरिकांच्या गैरसोय होऊ नये या करता सणाची सुट्टी असताना मनपा आयुक्त अजीज शेख समवेत संपूर्ण महापालिका प्रशासन रस्त्यावर उतरले होते. लोकसभा निवडणुकी मुळे बहुतांश कर्मचारी अधिकारी निवडणुकीच्या कामासाठी त्यांच्या सेवा अधिग्रहीत केलेल्या आहेत. यामुळे दैनंदिन काम करताना अत्यंत तुटपुंज्या मनुष्यळावर काम करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या शिवाय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जास्तीचे मनुष्यबळ लावून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे आणि एकनाथ पवार यांच्या नियंत्रणाखाली डीप क्लिनिंग कार्यक्रम अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती लेंगरेकर यांनी दिली आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -