Eco friendly bappa Competition
घर पालघर ...म्हणून थेट तरुणाची निर्घृण हत्याच केली

…म्हणून थेट तरुणाची निर्घृण हत्याच केली

Subscribe

गुन्हे शाखा कक्ष ०१ काशिमीरा चे अधिकारी व अंमलदार यांनी ४ तासात तपास करत सर्वप्रथम पाच आरोपींना ताब्यात घेतले व रात्री उशिरा ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

इरबा कोनापुरे, भाईंदर :- मिरारोड परिसरात एका पेट्रोल पंपावर काही कारणास्तव हर्ष राज व आयुष भानुप्रताप सिंग यांच्यामध्ये वाद झाला होता. हा वाद सोडवण्यासाठी अंकुश राज याने मध्यस्थी केली होती. त्यानंतर अंकुश राज व आयुष सिंग यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. या वादात अंकुश राज याची आयुष सिंग याने व त्याच्या सहकार्‍यांनी चाकूने वर करून सोमवारी सायंकाळी हत्या केली. अंकुशची आई रुपादेवी राजेशकुमार राज यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेऊन वारिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष १, काशिमीरा हे करत होते. गुन्हे शाखा कक्ष ०१ काशिमीरा चे अधिकारी व अंमलदार यांनी ४ तासात तपास करत सर्वप्रथम पाच आरोपींना ताब्यात घेतले व रात्री उशिरा ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिरारोड परिसरातील सिध्दीविनायक गॅरेज समोर, जांगीड सर्कल जवळ, एम.टी.एन.एल.रोड, मिरारोड पूर्व येथे सोमवारी सायंकाळी साडेसहा च्या सुमारास काही अज्ञात इसमांनी अंकुश राजेशकुमार राज, वय-२० याच्या छातीवर कोणत्यातरी हत्याराने गंभीर दुखापत करुन जीवे ठार मारले. यामध्ये आरोपी आयुष भानुप्रसाद सिंग (वय १९ वर्षे ) आकीब खालीद अन्सारी (वय २० वर्षे), शेख फरहान नजरे आलम (वय १८ वर्षे), अरमान हबीब लदाफ ( वय १८ वर्षे ), हैदर पैंगबर पठाण (वय १८ वर्षे ), अशपाक अख्तर मंसुर (वय २५ वर्षे), मेहताब रहीमुद्दीन खान (२२ वर्षे), अमित सौरव सिंग (वय २२ वर्षे), सरवर हुसैन शफीकउल्ला खान यांस ताब्यात घेण्यात आले. विचारणा केली असता मयत याचा मामा हर्ष राज व आरोपी आयुष भानुप्रताप सिंग यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यावेळी मृतक अंकुश राजेशकुमार राज याने त्यांची भांडणे सोडवल्याचा राग होता. त्यानंतर सोमवारी अंकुश राज व आयुष सिंग यांच्यामध्ये अंकुश काम करत असलेल्या ठिकाणी भांडण झाले. यावेळी अंकुश राज याने आयुष सिंग याला मारले. तेव्हा आयुष याने त्याच्या मित्राला फोन करून मला मारले आहे लवकर या असे सांगितले. त्यावेळी आयुष व त्याच्या मित्रांनी अंकुश राज याच्या छातीवर चाकूने वार करत दिवसा ढवळ्या हत्या केली आहे. या हत्येमुळे मिरारोड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी यांनी आपापसात संगनमत करून हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना या गुन्हयात अटक करण्यात आली. पुढील तपास मीरारोड पोलीस करत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -