घरपालघरपालघरमध्ये मालमत्ता कर थकबाकीधारकांवर कारवाई

पालघरमध्ये मालमत्ता कर थकबाकीधारकांवर कारवाई

Subscribe

पन्नासह हजारांहून अधिकची मालमत्ता करापोटी थकबाकी असलेल्या ७६ मालमत्ताधारकांना पालघर नगरपरिषदेने जप्तीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

पन्नासह हजारांहून अधिकची मालमत्ता करापोटी थकबाकी असलेल्या ७६ मालमत्ताधारकांना पालघर नगरपरिषदेने जप्तीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. आठवड्याभरात कराची रक्कम न भरल्यास मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे. पालघर शहरामध्ये मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर (घरपट्टी) थकवल्याने त्यांच्या मालमत्तेवर पालघर नगरपरिषदेमार्फत जप्तीची कारवाई केली जातआहे. यासाठी पहिल्या टप्प्यात नगरपरिषदेच्या घरपट्टी विभागाकडून ५० हजार रुपयांहून अधिकचा कर थकवणाऱ्या ७६ मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवण्यात आली आहे. येत्या आठवड्याभरात हा कर न भरल्यास नगरपरिषद त्यांची मालमत्ता जप्त करणार आहे. नगरपरिषदेने ही मोहीम महिनाभरापासून सुरु केली आहे.

मालमत्ता कर थकबाकी ठेवलेल्या मालमत्ताधारकांकडे जाऊन तो कर भरून घेण्यासाठी नगरपरिषदेमार्फत कर भरणा मोहीम सुरू आहे. या मोहिमेत दररोज सुमारे दोन लाखांची वसुली केली जात आहे. यासाठी पालघर नगरपरिषदेने चार पथके स्थापन केली आहेत. पाच ते सहा जणांचा समावेश असलेली ही फिरती पथके थकबाकीदारांपर्यंत पोहोचून त्यांच्याकडून करवसुली करून घेत आहेत.

- Advertisement -

पालघर नगरपरिषद हद्दीमध्ये ३३ हजारांहून जास्त मालमत्ताधारक आहेत. या मालमत्तांपोटी नगरपरिषदेला दर वर्षाला बारा कोटींच्या जवळपास मालमत्ताकर मिळतो. सद्य:स्थितीत पालघर नगरपरिषदेमध्ये पाच कोटींचा कर जमा झाला आहे. उर्वरित मालमत्ता कर जमा करण्यासाठी नगरपरिषदेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. आर्थिक वर्ष संपत आले असताना मालमत्ताधारक स्वत:हून मालमत्ता कर भरणा करत नसल्यामुळे पथके स्थापन करूनत्यांच्याद्वारे हा कर वसूल केला जात आहे. पन्नास हजारांपेक्षा जास्त मालमत्ता कर थकीत असलेल्या ७६ थकबाकीदारांना एक कोटी ५० लाखांचा मालमत्ता कर येणे आवश्यक होते. मात्र तो आला नसल्याने जप्तीच्या नोटिसा नगरपरिषदेमार्फत पाठवण्यात आल्या आहेत. मालमत्ता कर थकबाकी ठेवलेल्या या थकबाकीदारांची नावेही वृत्तपत्र व इतर माध्यमांतून जाहीर करण्यात येणार आहेत. याचबरोबर रहिवास, वाणिज्य व इतर सामान्य मालमत्ताधारकांनाही नोटिसा व फिरत्या पथकाद्वारे दारोदारी जाऊन घरपट्टी वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा –

एका मांजरामुळे 60 हजार ग्राहकांवर अंधारात राहण्याची वेळ; नेमकं काय घडलं?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -