घरपालघरगुरचरण जागेवरील कारखान्यावर कारवाईला टाळाटाळ

गुरचरण जागेवरील कारखान्यावर कारवाईला टाळाटाळ

Subscribe

पालघर नगरपरिषदेच्या नवली गावच्या हद्दीतील गुरचण जागेत अतिक्रमण करून अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या कारखान्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचे उजेडात आले आहे.

पालघर नगरपरिषदेच्या नवली गावच्या हद्दीतील गुरचण जागेत अतिक्रमण करून अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या कारखान्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचे उजेडात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अनधिकृत कारखान्याचे बांधकाम निष्कासित करण्याचे आदेश २०१६ साली दिल्यानंतर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. पालघर नगरपरिषद हद्दीतील नवली येथील सर्वे नं. ४८ या गुरचरण जमिनीवर असलेले कारखान्याचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याकरता पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी २०१६ साली पालघर तहसिलदार यांना आदेश दिले होते. तहसिलदारांनी या अनधिकृत बांधकामावर कुठलीही कारवाई न करता त्यांनी आपली जबाबदारी झटकत पालघर नगरपरिषदेला कारवाई करण्याचे पत्र दिले होते.

असा कुठलाही अहवाल मी पाठवलेला नाही. त्यांचा गैरसमज झाला आहे.
– रोशनी तामखेडे, सहाय्यक नगरचनाकार, पालघर नगरपरिषद

- Advertisement -

त्यानंतर पालघर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्वाती देशपांडे यांनी नगरपालिकेच्या नगररचनाकार विभागाकडून या अतिक्रमणाबाबत अहवाल मागितला आहे. सहाय्यक नगररचनाकार रोशनी तामखेडे यांनी कारखानदाराच्या दिशाभूल करणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे सर्वे नं. ४८ पालघर नगरपरिषदेच्या हद्दीत असतानाही हे बांधकाम माहिम ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याचा अहवाल मुख्याधिकाऱ्यांना पाठवला आहे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब गुंड यांनी पुणे येथील नगररचना व मूल्य निर्धारण विभागाचे संचालक यांच्याकडे केली आहे. नगररचनाकार आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत नसून धनदांडग्या लोकांच्या बाजूने न्याय देत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही गुंड यांनी केली आहे.

(नदीम शेख – हे पालघरचे वार्ताहर आहेत.)

- Advertisement -

हेही वाचा –

Anganewadi jatra 2022: आंगणेवाडी यात्रेनिमित्त मध्य रेल्वेवर १० विशेष गाड्या, पाहा संपूर्ण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -