घरपालघरडिसिल्वा यांच्या कथांना वसईच्या माती आणि संस्कृतीचा गंध

डिसिल्वा यांच्या कथांना वसईच्या माती आणि संस्कृतीचा गंध

Subscribe

तसेच प्रत्येक कथेचा अभ्यासपूर्ण सारांश सांगताना ह्या कथांमध्ये गॉसिपिंग नाही तर समाज निरीक्षण, आजूबाजूची अस्वस्थता आहे, असे नमूद केले.

वसई:इथल्या मातीशी एकरूप झालेल्या मॅटिल्डा अँथनींच्या कथांना वसईच्या संस्कृती ,मातीचा, भाज्यांचा गंध व गावठी गुलाबफुलांचा दरवळ येतोय. तिने खूप लिहावे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांनी लेखिका मॅटिल्डा अँथनींच्या निवांत या कथासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना काढले. वसईच्या लेखिका मॅटिल्डा थनी डिसिल्वा यांच्या ’निवांत’ या पुस्तकाचे प्रकाशन ’ग्रंथाली’ प्रकाशन संस्थेतर्फे वसईतील मर्सेस येथे संपन्न झाले. वसईतील विचारवंत व साहित्यिक ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. समारंभाचे अध्यक्ष मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरीया, सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. सिसिलिया कर्व्हालो, ‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुदेश हिंग्लासपूरकर आदी यावेळी उपस्थित होते. लेखिका मॅटिल्डा व त्यांचे पती अँथनी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. सिसिलिया कर्व्हालो यांनी, कथासंग्रहातील कथांचे विश्लेषण अणि पुस्तकाचा इतिहास कथन केला. तसेच प्रत्येक कथेचा अभ्यासपूर्ण सारांश सांगताना ह्या कथांमध्ये गॉसिपिंग नाही तर समाज निरीक्षण, आजूबाजूची अस्वस्थता आहे, असे नमूद केले.

लेखिका मॅटिल्डा यांनी आपल्या मनोवस्थेची तुलना पहिल्यांदा बाळंत होणार्‍या मातेशी केली. पहिले बाळ जन्माला येत असताना अवस्था असते तशीच आपली झाली आहे. पहिलेच पुस्तक त्याचे स्वागत कसे होईल? याची उत्कंठा असते. असे सांगून, त्यांनी कथा कशा सुचत गेल्या यापासून ते पुस्तक निर्मितीपर्यंतचा प्रवास कथन केला. आपली पहिली कथा सात वर्षांपूर्वी “लीलाई” दिवाळी अंकाने प्रसिद्ध करून प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. स्वत:चा दुर्धर आजार, त्याच्याशी सामना करताना, लाभलेली कुटुंब अणि पती अँथनी यांचे सहकार्य अशा बर्‍याच गोष्टी त्यांनी थोडक्यात सांगितल्या. मॉन्सिनियर फ्रांसिस कोरिया यांनी, लेखिकेला नाताळच्या चांदणीची उपमा देताना ही चांदणी आता प्रकाशमान झाली आहे. तिला लघुकथेचे तंत्र आणि मंत्र गवसलंय, असे सांगून पुस्तक खुप दर्जेदार झाल्याचे ते म्हणाले. सुदेश हिंग्लासपुरकर यांनी आपल्या लहानशा मनोगतात संवाद साधताना ग्रंथालीचे कार्य सर्वांसमोर ठेवले. सिलीन डिसिल्वा यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. उज्ज्वला लेमॉस यांनी प्रास्ताविक तर अचला मच्याडो यांनी सूत्रसंचालन केले. दीपक मच्याडो यांनी आभार प्रदर्शन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -