घरपालघरटायर कंपनीत स्फोट, एका कामगाराचा मृत्यू

टायर कंपनीत स्फोट, एका कामगाराचा मृत्यू

Subscribe

कंपनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाला असल्याने कंपनीचे मुख्य व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम वाडा पोलिस ठाण्यात सुरू असल्याची माहीती पोलीसांनी दिली.

वाडा: तालुक्यातील ऊसर या गावाच्या हद्दीत असलेल्या सारिका इंटर नॅशनल रेटिंग प्रा.लि . या टायर कंपनीत शनिवारी रात्रीच्या सुमारास रिअ‍ॅक्टरचा स्फोट होऊन एक कामगार ठार झाला असून दोन कामगार जखमी झाले आहेत. या प्रकरणात हलगर्जीपणाचा ठपका ठेवून टायर कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. राहुल पासवान( वय 20)असे मृत्यूमुखी पडलेल्या तरूणाचे नाव असून सुनील पासवान(वय 20) समिंदर उमार सिंह( 28) हे दोन कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाडी येथील साईदत्त रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुक्यातील ऊसर या गावाच्या हद्दीत’ सारिका इंटर नॅशनल प्रा.लि.ही टायर ’ कंपनी असून या कंपनीत गाड्यांच्या जुन्या टायरमधून फर्नांस ऑईलचे उत्पादन घेतले जाते.शनिवारी रात्रीच्या सुमारास कंपनीत काम सुरू असताना रिअ‍ॅक्टरचा स्फोट होऊन रिअ‍ॅक्टरमधील गॅस जोरात बाहेर आल्याने मशिनमधील झाकणाचा जोराचा फटका राहुल याच्या डोक्याला लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सुनील, सविंदर उमार हे दोन कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाडी येथील साईदत्त रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कंपनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाला असल्याने कंपनीचे मुख्य व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम वाडा पोलिस ठाण्यात सुरू असल्याची माहीती पोलीसांनी दिली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -