घरपालघरमुद्रा कर्ज देण्याच्या नावाने फसवणूक

मुद्रा कर्ज देण्याच्या नावाने फसवणूक

Subscribe

आरोपीने तक्रारदाराला कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल ६.५० लाख रुपयांचा गंडा घातला असून तक्रारींनंतर दोन महिन्यांतच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात डहाणू पोलिसांना यश आले आहे.

डहाणू: डहाणू शहरातील एका व्यावसायिकाला मुद्रा कर्ज योजनेतून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणार्‍या आरोपीला डहाणू पोलिसांच्या टीमने जळगावमधून अटक केली आहे. आरोपीने तक्रारदाराला कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल ६.५० लाख रुपयांचा गंडा घातला असून तक्रारींनंतर दोन महिन्यांतच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात डहाणू पोलिसांना यश आले आहे.

डहाणू शहरातील एका व्यापार्‍याला गाळा विकत घेण्यासाठी २७ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज काढण्यासाठी मदत करण्याच्या नावाखाली अरविंद बावीस्कर यांनी टप्प्याटप्प्याने ६ लाख ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर वेळोवेळी कारणे देत फसवणूक केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. याविषयी डहाणू पोलीस ठाण्यात २५ ऑगस्ट २०२३ रोजी आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर डहाणू पोलिसांनी आरोपीचा कसून शोध घेत त्याला जळगावमधून अटक केली आहे. डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी संजीव पिंपळे, डहाणू पोलीस ठाणे प्रभारी सुधीर संखे यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत डांगे, नारायण पाटील आणि टीमने अरविंद बावीस्कर याचा कोणताही मागमूस नसताना शोध घेऊन त्याला जळगाव जिल्ह्यातील एका गावातून अटक केली. आरोपीला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -