घरमहाराष्ट्रSanjay Mandlik : शब्द चुकलो पण अवमान नाही, छत्रपती शाहूंवरील टीकेवर मंडलिकांचे...

Sanjay Mandlik : शब्द चुकलो पण अवमान नाही, छत्रपती शाहूंवरील टीकेवर मंडलिकांचे स्पष्टीकरण

Subscribe

खासदार संजय मंडलिकांनी शाहू महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे. मी बोलताना एक शब्द चुकलो, पण मी अपमान केला नाही, असा दावा खासदार संजय मंडलिक यांच्याकडून करण्यात आला आहे.

कोल्हापूर : शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी मविआचे कोल्हापुरचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. मंडलिकांनी शाहू महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे. या मुद्द्यावरून मविआच्या नेत्यांनी निशाणा साधला असून याबाबत आता खासदार संजय मंडलिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी बोलताना एक शब्द चुकलो, पण मी अपमान केला नाही, असा दावा खासदार संजय मंडलिक यांच्याकडून करण्यात आला आहे. (Sanjay Mandalik explanation of Chhatrapati Shahu Maharaj criticism)

खासदार संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद पेटला आहे. याबाबत आता मंडलिकांनी समोर येऊन स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, मी बोलताना एक शब्द चुकलो. आताचे शाहू महाराज हे थेट वारसदार नाहीत, असे मला म्हणायचे होते. शाहू महाराज यांनी दत्तक विधानाबाबत स्वतःच सांगावे, त्यामुळे मी दत्तक विधान कसे बोललो हे देखील सांगावे? मी शाहू महाराजांचा कोणताही अपमान केला नाही, असे म्हणत मंडलिक यांनी ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Sharad Pawar on Sanjay Mandlik : खालच्या पातळीचे राजकारण…, शरद पवारांनी मंडलिकांना सुनावले

तसेच, यावेळी त्यांनी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांच्यावरही तोफ डागली. आमचे ठरले आहे. याचे ओझे डोक्यावर खूप होते. मंडलिक नेहमी केलेल्या मदतीची उतराई करतात. मात्र, आम्ही कधी मदत केली, तर त्यांना कधी मदत वाटली नाही. नवीन मित्र धनंजय महाडिक झाल्यानंतर सतेज पाटील यांच्या पोटात दुखू लागले आहे. आमदार-खासदार म्हणजे त्यांना अजिंक्यतारावर नोकर वाटतात. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला मी 12 वा खासदार होतो, पण त्यावेळी सोबत गेलेले आमदार जास्त लाडके होते. एकनाथ शिंदे त्यावेळी म्हणाले, गरिबासारखे शेकडो निधी काय मागता? एकनाथ शिंदे म्हणाले हजारो कोटी देतो, असे म्हणत पाटलांवर टीका केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले संजय मंडलिक?

कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील नेसरी येथील सभेत बोलताना खासदार संजय मंडलिक यांनी मविआतून काँग्रेसतर्फे निवडणूक लढणारे छत्रपती शाहू महाराज यांच्याबाबत बोलताना जीभ घसरली. मल्लाला हातच लावायचा नाही… मल्लाला टांगच मारायचे नाही… मग ती कुस्ती कशी होणार? कुस्ती तर झाली पाहिजे…, असा टोला मंडलिक यांनी शाहू महाराज यांचे नाव न घेता लगावला.

तर, आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही आम्ही आणि ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असे वादग्रस्त वक्तव्य संजय मंडलिक यांच्याकडून करण्यात आले. पण ते इतक्यावरच नाही थांबले तर ते पुढे म्हणाले की, माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी आयुष्यभर खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपला. कारण ही शाहू महाराजांची भूमी आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी पुरोगामी व समतेचा विचार जपला शिकवला. या जिल्ह्यात जन्मलेला प्रत्येक महिला, पुरुषमध्ये जन्मजात डीएनएमध्ये हवेत आणि पाण्यात शाहूंचे गुण आहेत, असेही मंडलिक यांच्याकडून सांगण्यात आले.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : शरद पवारांनी 10 वर्षात राज्याला काय दिले? अमित शहांचा सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -