घरक्रीडाMi vs Rcb Match : बुमराह ठरला पर्पल कॅपचा मानकरी; कोहलीला केले...

Mi vs Rcb Match : बुमराह ठरला पर्पल कॅपचा मानकरी; कोहलीला केले पाचव्यांदा आऊट

Subscribe

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पाच गडी बाद केले आहेत. आजचा सामना बुमराहसाठी विक्रमांचा ठरला. या सामन्यात बुमराहने विराट कोहली याला बाद केले. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये पाचव्यांदा बुमराहने विराट कोहलीला बाद केले आहे.

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पाच गडी बाद केले आहेत. आजचा सामना बुमराहसाठी विक्रमांचा ठरला. या सामन्यात बुमराहने विराट कोहली याला बाद केले. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये पाचव्यांदा बुमराहने विराट कोहलीला बाद केले आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत बंगळुरूने 197 धावांचे आव्हान मुंबईसमोर ठेवले आहे. (Mi vs Rcb Match Bumrah Wins Purple Cap And Fifth Time Take Wicket Of Virat Kohli)

आयपीएलचा आजचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ यंदाच्या आयपीएलच्या गुणतालिकेत तळाशी आहेत. त्यामुळे हा सामना जिंकण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल. या सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करताना मुंबईने सुरूवातील आक्रमक गोलंदाजी केली. या सामन्यात बुमराहने चार षटकांत 21 धावा देत पाच गडी बाद केले.

- Advertisement -

हेही वाचा – Rohit Sharma : MI मालक आणि ‘मुंबई’चा राजा हिटमॅनचा एकाच गाडीतून प्रवास; पडद्यामागे काही घडतंय?

आजच्या सामन्यात बुमराहने विराट कोहलीला पाचव्यांदा बाद केले आहे. या सामन्यात विराट कोहली स्वस्त:त बाद झाला. त्यानुसार, विराट नऊ चेंडूत तीनच धावा करत तंबूत परतला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर आपली विकेट गमावली.

- Advertisement -

या सामन्यात बुमराहने बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसीससह (61) विराट कोहली (3), महिपाल लोमरोर (0), सौरव चौहान (9) आणि वैशाख कुमार (0) यांना बाद केले. विशेष म्हणजे यंदाच्या आयपीएलमध्ये पाच गडी बाद करणारा जसप्रीत बुमराह हा पहिला गोलंदाज ठरला आहे.


हेही वाचा – MI vs RCB IPL 2024 : बंगळुरूविरुद्धच्या सामन्यांमध्ये मुंबईचं पारडं जड; पाहा हेड टू हेड आकडेवारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -