घरपालघरVasai Leopard News: बिबट्यामुळे रो-रो सेवेवर परिणाम

Vasai Leopard News: बिबट्यामुळे रो-रो सेवेवर परिणाम

Subscribe

तेव्हापासून बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. पण, बिबट्या अद्यापही हाती लागलेला नाही.

वसईः वसईच्या किल्ल्यात २९ मार्चला आलेल्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अजूनही यपस्थितीतशपस्थितीत आले नसल्याने नागरीक आणि पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यातच वनविभागाने किल्ल्यात बिबट्या अद्यापही मोकाट फिरत असल्याने खबरदारी म्हणून वसई तसागरेसागर भाईंदर दरम्यानची रो-रो सेवा संध्याकाळी सहानंतर बंद करण्याची मागणी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे केली आहे. २९ मार्चला वसई किल्ल्यात एका दुचाकीस्वाराला बिबट्याने धडक मारल्याची घटना घडली होती. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्येही बिबट्या किल्ल्यात मोकाट फिरत असल्याचे दिसून आले होते. तेव्हापासून बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. पण, बिबट्या अद्यापही हाती लागलेला नाही.

बिबट्याच्या वावराने किल्ला परिसरातील गावकरी भयभित झाले आहेत. यावर त्वरीत कारवाई व्हावी यासाठी प्रांताधिकार्‍यांनी एक बैठक बोलावली होती. त्यात गावकर्‍यांनी वनविभागाच्या उदासिनतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. किल्ल्यातील बिबट्यामुळे या भागातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. अशी परिस्थिती असतानाही वनविभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याचा आरोप कोळी युवा शक्ती संघटनेचे मिल्टन सौदीया यांनी केला आहे. तर बिबट्यामुळे यनंदानंद भागातील नागरिकांची यविंदे,जनार्दनेविंदे, जा करण्याची वहिवाट कायमची बंद करण्याचा हा डाव तर नाही ना असा संशय संजय कोळी यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

नागरिकांना विश्वासात घेतले जात नाही. रोरो सेवा,ताडी उतरवणारे व पर्यटकांना या भागात प्रवेश करू दिला जातो. पण, येथील स्थानिक नागरिकांना जाण्यास बंदी घातली जाते. त्यामुळे नागरिकांनी जगायचे कसे असा प्रश्नही गावकर्‍यांनी उपस्थित केला आहे. बिबट्याच्या वावरामुळे असंख्य अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आपले प्रयत्न वाढवा अशा सूचना वसईचे उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी केल्या आहेत.
बिबट्या तुंगारेश्वर जंगलातून या भागात आला आहे. त्याला पकडण्यासाठी ट्रॅप कॅमेरे,आवश्यक ठिकाणी पिंजरे लावले आहेत. परंतु बिबट्या बाहेर येण्याच्या वेळेत सातत्याने मानवी वर्दळ,रोरो सेवा यामुळे पकडण्यात अडचणी येत असल्याचे मांडवी वनपरीक्षेत्र अधिकारी श्वेता आडे यांचे म्हणणे आहे. त्यासाठी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर रोरो सेवा बंद करावी अशी मागणी वनविभाग आणि पुरातत्व विभागाने महाराष्ट्र सागरी मंडळाकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -