घरपालघरमुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवा

मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवा

Subscribe

तसेच आपल्या संपूर्ण तालुक्यात पहिली ते दहावीपर्यंत शाळेत मुलींची संख्या जास्त आहे आणि मुले कमी आणि दहावी पास झाल्यानंतर ज्यावेळी कॉलेजला मुले जातात, त्यावेळी मुलींची संख्या मुलांच्या संखेपेक्षा खूपच कमी असते.

मोखाडा,ज्ञानेश्वर पालवे : मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी पालकांनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ यांनी केले आहे. आदिवासी माध्यमिक विद्यालय डोल्हारा येथे 10 वी च्या मुलांच्या निरोप समारंभा प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले ,” मी प्रत्येक वेळी आपल्या हायस्कूलमध्ये येवून नेहमीच मारदर्शन करतो आणि येथील शाळेचा निकाल नेहमीच 90%,95% टक्केच लागतो. या वर्षी 100%लागावा अशा शुभेच्छा देतो.” पुढील जीवन सुखकर करायचं असेल तर तुम्ही अभ्यास करा. जीवनात कलेक्टर व्हायचे स्वप्न अंगीकारा म्हणजे आपण कुठे तरी तहसीलदार किंवा प्रांत असे तालुक्यातील महत्वाच्या पदावर बसू शकतो. तसेच आपल्या संपूर्ण तालुक्यात पहिली ते दहावीपर्यंत शाळेत मुलींची संख्या जास्त आहे आणि मुले कमी आणि दहावी पास झाल्यानंतर ज्यावेळी कॉलेजला मुले जातात, त्यावेळी मुलींची संख्या मुलांच्या संखेपेक्षा खूपच कमी असते. या गोष्टी का होतात. तर, आपल्या ग्रामीण भागात दहावी झाल्यानंतर मुलीचे आईवडील मुलींची लगेच लग्न करून देतात. किंवा वडील कॉलेजला पाठवत नाहीत, आणि शिक्षण देण्यासाठी आर्थिक अडचणी सुद्धा असतात अशा अनेक कारणाम्यांमुळे मुलींची संख्या आपल्याला कॉलेजमध्ये कमी प्रमाणात आढळून येते,असे यावेळी वाघ म्हणाले. यावेळी आदिवासी माध्यमिक विद्यालय डोल्हारा शाळेचे मुख्याध्यापक जयपाल चिमणकर , उलाब नरवाडे , चुडामन पाटील , शुभांगी पाटील , विजय विरनक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामचंद्र खोरगडे, पोलीस पाटील विठ्ठल गोडे, रमेश गभाले, नाना जाधव, सर्व ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते

यावेळी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजना (nmms)या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना उपसभापती प्रदीप वाघ यांच्या हस्ते प्रमान पत्र देऊन मुलांचा सन्मान केला. ही परीक्षा इयत्ता 8 विच्या मुलांची घेतली जाते. या परीक्षेत मिरीटने मुले पास झाले तर आठवी ते बारावीपर्यंत त्या मुलांना त्यांच्या खात्यावर 60,000 हजार रुपये शिक्षणासाठी देण्यात येतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -