घरपालघरबहुचर्चित डहाणू महोत्सवाला सुरूवात,तीन दिवस चालणार

बहुचर्चित डहाणू महोत्सवाला सुरूवात,तीन दिवस चालणार

Subscribe

येथील स्थानिकांना रोजगार मिळावा, या भागातील विविध संस्कृती, खानपान सर्वांसमोर पोहचावे,यासाठी अशा महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे.राज्यातून आणि परराज्यातून नागरिक येथे भेट देत आहेत.

डहाणू: डहाणू तालुक्यातील सागरी भागात पर्यटन वाढावं, यासाठी डहाणू समुद्रकिनार्‍यावर महोत्सवाच आयोजन केले जाते. आज २३ रोजी हा डहाणू महोत्सव डहाणू नगरपरिषद, डहाणू महसूल विभाग, यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला.पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. सुरूवातीला गणेश स्तुती, पारंपारिक मोखाडा येथील भोवाडा नृत्य , तसेच डहाणू माहिती पट , डहाणू महोत्सव २.०माहिती पट यांची माहिती देण्यात आली. येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डहाणू नगरपरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी वैभव आवारे म्हणाले की, प्रगतशील शहर असणार्‍या डहाणूला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. येथील विविध संस्कृती अजून फार दूरपर्यंत पोहचावी. तसेच या भागातील पर्यटन वाढावे, येथील स्थानिकांना रोजगार मिळावा, या भागातील विविध संस्कृती, खानपान सर्वांसमोर पोहचावे,यासाठी अशा महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे.राज्यातून आणि परराज्यातून नागरिक येथे भेट देत आहेत.

या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती पाटोदा येथील नामांकित आदर्श सरपंच म्हणून भास्कर पेरे पाटील उपस्थित होते. त्यांना आदर्श सरपंच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी आपल्या भाषणात सरपंच आणि सदस्यांना मार्गदर्शन करताना विविध योजनांची आणि हक्काची जाणीव करून दिली. सरपंच हा गावचा प्रमुख असतो अनेक योजनांची माहिती त्याने घेतल्यास आपला गाव तो सुधारू शकतो, असे बहुमूल्य मार्गदर्शन केले.याकरिता या महोत्सवात सरपंच महापरिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

सदर डहाणू महोत्सवासाठी जवळपास दोन विविध खाद्यपदार्थांचे आणि विक्रेत्यांचे स्टॉल लावले होते. त्याचबरोबर एअर क्राफ्ट , सागरी साहशी खेळ तसेच विविध 600 खेळ यांची सुद्धा धूम सुरू आहे.यावेळी खासदार राजेंद्र गावित,डहाणूचे आमदार विनोद निकले, विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा,पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम,
भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, डहाणूचे तहसीलदार अभिजित देशमुख,नगर परिषदचे मुख्याधिकारी वैभव आवारे उपस्थित होते.

महोत्सवाच्या ठिकाणी पालक मंत्री येताच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.तसेच ढोल देखील वाजवण्यात आले. परंतु, याच ठिकाणी रस्त्यालगत असलेल्या के एल पोंदा हायस्कूलमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचे बोर्डाचा पेपर चालू असल्याने व्यत्यय आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

 

तसेच या महोत्सवाच्या दोन स्वागत प्रवेशद्वारांवर दोन कमानी तयार करण्यात आल्या होत्या. त्या कमानींवर जवाहर लाल नेहरू पत्तन प्राधिकरण (जेएनपीए) यांच्या नावाने बॅनर लावण्यात आले होते. मात्र, या संदर्भात वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीकडून याबाबत पत्र व्यवहार केल्याने पोलीस प्रशासन आणि नगर परिषद डहाणू यांनी हे तात्काळ हटविले.

 

विकसित भारत घडविण्यासाठी असलेल्या योजनांची माहिती, निधी, विनियोग कसा करावा या साठी महापरिषद आयोजित केली आहे. यात जल जीवन, शबरी, जनमन अशा विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे.

– रवींद्र शिंदे , जि. प. कार्यकारी अधिकारी, पालघर

 

डहाणू म्हणजे निसर्ग संपन्न भाग आहे. या भागातील खाद्य संस्कृती तसेच येथील निसर्ग रम्य समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे पर्यटकांना बघण्याची संधी मिळणार आहे. रोजगार वाढावेत तसेच येथील पर्यटन बहरावे. यासाठी या महोत्सवाचा उपयोग झाला पाहिजे.

– विनोद निकोले, डहाणू, आमदार

राष्ट्राचा विकास करणारा माणूस म्हणजे सरपंच. गावाचा कारभार करत असताना विविध समस्या सोडविण्यात मोठा हातभार आहे. तो कणा असतो. सरपंचासाठी खास मागणी केली एकदा निवडून गेल्यानंतर तो कोणताही पक्षाचा नसतोत्. या मुळे सर्वांना समान निधी द्यावा . सरपंचाने ग्रामसेवकांची वाट पाहू नये.
– प्रकाश निकम, जि. प. अध्यक्ष पालघर.

डहाणूमधील हा महोत्सव येथील पर्यटनाला संजीवनी देईल. येथील अथांग समुद्राकडे पाहिल्यास पर्यटन व्यवसाय चांगला बहरू शकतो. कोकणाला ७२०किलोमीटरचा मोठा समुद्र किनारा लाभला आहे. या मुळे पर्यटन वाढावे यासाठी उपयुक्त आहे. माझे शहर साफ राहिल या साठी प्रयत्न करावेत. डहाणूच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही
– रवींद्र चव्हाण ,सार्वजनिक बांधकाम , पालकमंत्री.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -