घरपालघरपत्नीच्या मारेकर्‍याने केली भाच्याची हत्या

पत्नीच्या मारेकर्‍याने केली भाच्याची हत्या

Subscribe

शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास चुलतमामा चंदू खरपडे यांची मुले प्रदीप खरपडे (३१) आणि विकास खरपडे (२३) यांच्यासह बाहेर गेला होता.

डहाणूः पत्नीची हत्येचा आरोप असलेल्या पतीने किरकोळ वादातून आपल्या भाच्याचाच खून केल्याची खळबळजनक घटना तलासरी तालुक्यातील झरी फोंडापाडा येथे शनिवारी संध्याकाळी घडली असून याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. चंदू खरपडे (५३) असे मारेकर्‍याचे नाव असून हत्या केल्यानंतर जंगलात पळून गेलेल्या चंदूला पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अटक केली आहे. मुंबईत वडिलांसह मासेमारी बोटीवर काम करणारा देवराम रध्या जवलिया (३०) आपल्या तलासरी येथील झरी फोंडापाडा येथील घरी आला होता. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास चुलतमामा चंदू खरपडे यांची मुले प्रदीप खरपडे (३१) आणि विकास खरपडे (२३) यांच्यासह बाहेर गेला होता.

तिघेही रात्री ८ वाजता घरी परतले होते. घरी आल्यावर देवरामने वाहन जोरात चालवल्याच्या मुद्द्यावरून तिघांमध्ये वाद होऊन झटापटी सुरू होती. यावेळी चंदू खरपडे याने मागून येऊन देवरामच्या मानेवर चाकूने वार केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या देवरामला तलासरी येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी देवरामला मयत घोषित केले. याहत्येनंतर तलासरी पोलिसांनी चंदूसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, हत्या केल्यानंतर चंदू जवळच्या जंगलात लपून बसला होता. पोलिसांनी रात्रीच त्याला अटक केली आहे. चंदूने आपल्या पत्नीचीही याआधी हत्या केली होती. त्यात त्याला तुरुंगवासही झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -