घरक्राइमPune : पुण्यातील गुरुवार पेठेत तरुणीची आत्महत्या; MPSCची करत होती तयारी

Pune : पुण्यातील गुरुवार पेठेत तरुणीची आत्महत्या; MPSCची करत होती तयारी

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी, आत्महत्या, ड्रग्जचे सेवन अशा अनेक घटनांमध्ये पुणे शहराचे नाव सातत्याने चर्चेत येत आहे. अशात स्पर्धा परीक्षेची म्हणजेच एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. अभिलाषा मित्तल (27) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून ती मूळची वाशिम जिल्ह्यातील आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी, आत्महत्या, ड्रग्जचे सेवन अशा अनेक घटनांमध्ये पुणे शहराचे नाव सातत्याने चर्चेत येत आहे. अशात स्पर्धा परीक्षेची म्हणजेच एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. अभिलाषा मित्तल (27) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून ती मूळची वाशिम जिल्ह्यातील आहे. (pune news washim girl who preparing for mpsc exam suicide in hostel)

पुण्यातील गुरुवार पेठेतील एका मुलींच्या हॉस्टेलमध्ये अभिलाषा राहत होती. आत्महत्येनंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता, पीडित तरुणीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचे समोर आले. त्यामुळे आत्महत्या की हत्या आहे, याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम येथील रहिवाशी असलेली अभिलाषा मित्तल ही पुण्याच्या गुरुवार पेठेतील एका मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहत होती. याच हॉस्टेलमध्ये अभिलाषाने गळफास लावून आत्महत्या केली. अभिलाषाच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण पोलिसांना अभिलाषाच्या आत्महत्येची माहिती मिळताच त्यांनी अधिक तपासाला सरुवात केली आहे.

हेही वाचा – Pune Crime : अपहरण करून 22 वर्षीय तरुणीची हत्या; अहमदनगरमध्ये सापडला मृतदेह

- Advertisement -

याप्रकरणी अभिलाषाच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा ही हॉस्टेलच्या खोलीत एकटीच होती. त्यावेळी तिने खोलीचा दरवाजा आतून बंद केला. खोलीतून आवाज येत नसल्याने मैत्रिणीने दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केले. पण दरवाजा उघडला जात नव्हता ना आतून कुठलाच आवाज येत होता. त्यावेळी खिडकीतून पाहिले असता अभिलाषाने आत्महत्या केल्याचे दिसले.

याप्रकरणाची पोलिसांना माहिती देताच घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेत तपास सुरू केला. पण आत्महत्येनंतर आभिलाषाचा अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. त्यामुळे ही हत्या आहे की, आत्महत्या याचाच पोलीस तपास करत आहेत.


हेही वाचा – Pune Crime : पुण्यात माणुसकीला काळिमा; पत्नीच्या मदतीने 19 वर्षीय तरुणीवर पतीचा बलात्काराचा प्रयत्न

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -